2025-26 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने टीडीएस, ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या व्याजावरचा कर कमी केला आहे. इतकंच नाही तर अनेक वैद्यकीय सुविधा आणि औषधांवरचा करही रद्द केला आहे.
केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांवर लागणाऱ्या कराची सीमा 50 हजारवरून एक लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तसेच घरभाड्यावरून मिळणाऱ्या टीडीएसवरची सुट 6 लाख रुपयांपर्यंत केली आहे. सरकारने 36 महत्त्वांच्या औषधांवर कर काढूला आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना औषधोपचार करताना दिलासा मिळाला आहे. सरकारने 6 महत्त्वांच्या औषधांवरची कस्टम ड्युटी 5 टक्क्यांनी कमी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसच्या मर्यादेत एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे व्याजावर मिळणाऱ्या उत्पन्नावरचा कर कमी होणार आहे.