कोरपना (Chandrapur):- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व जिवती तालुक्यातील मध्यभागी गडचांदूर लगत असलेल्या माणिकगड किल्ल्याच्या (Manikgad forts)पायथ्याशी मोठ्या प्रमाणात कोंबड बाजाराची थरारक झुंज चालू असताना पोलिस विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून अनभिज्ञ कसे काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
कोंबड बाजाराची थरारक झुंज चालू असताना पोलिस विभागाचे याकडे दुर्लक्ष
तालुक्यातील गडचांदुर व परिसर औद्योगिक असल्याने व जिवती तालुक्यातील येथील कोंबडा बाजारात शौकीनांची परिसरातील अनेक गावातून दुचाकी व चार चाकीने माणिकगड पायथ्याशी दर रविवार, मंगळवार, शुक्रवार या दिवसात तेथे मोठी गर्दी जमवून लाखोच्या पैज या बाजारात लावल्या जातात तसेच या ठिकाणी झंडी मुंडी सह शौकीनांकडून लाखोची उलाढाल या ठिकाणी होत असल्याची माहिती आहेत या ठिकाणी कोंबडा बाजार शौकीनांसाठी नास्ता पाण्यासह सर्व बिनबोबाटपने सुरु असताना गडचांदूर पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेत.
मोठी गर्दी जमवून लाखोच्या पैज या बाजारात लावल्या जातात
या ठिकाणी वेकोलितील, व ओद्योगिक परिसर असल्याने कामगार वर्ग तसेच कापूस उत्पादक शेतकरी (Farmer)कापसाचा चुकारा मिळताच कोंबड बाजार व झेंडी मुंडीत लाखोची पैज लावत असल्याने त्यांचे परिवार उद्वस्त होत आहे. गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार याकडे गंभीर्याने लक्ष देऊन या कोंबडा बाजार शौकीनांच्या घर उद्वस्त करणारा बाजार बंद करणार अशी आशा महिला व नागरिकांतून व्यक्त होत आहेत.