पूर्वी तिकीट स्वस्त होते, आता लोकांचा जीव स्वस्त झाला:जळगाव रेल्वे अपघातावरून नाना पटोलेंचा मोदी सरकारवर निशाणा; PM मोदींच्या राजीनाम्याचीही मागणी
3 hours ago
1
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका येथील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात घडला आहे. या अपघातावर बोलतांना नाना पटोले यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. पटोले म्हणाले- पूर्वी रेल्वेचे तिकीट स्वस्त होते, पण सध्या प्रवाशांचा जीव स्वस्त झाला आहे. पटोले म्हणाले- जळगावजवळ झालेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या अपघातातील जखमींची आकडेवारी ही समोर येत आहे. या अपघातात 25-30 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे. अलीकडच्या काळात रेल्वेच्या अपघातात होणाऱ्या मृत्यू होतांना आपण पाहत आहे. सध्या रेल्वे अपघातात सामान्य लोकांचे अपघात होत असतांना आपण पाहतोय. मोदी सरकारवर निशाणा साधत पटोले म्हणाले की, सरकारने कवच नावाची योजना आणलेली आहे. लोकांना वाटते की, नरेंद्र मोदींनी आपल्याला कवच दिले आहे. त्यामुळे कुठल्याही दुर्घटनाग्रस्त आणि निर्दोष लोकांना जीव जाणार नसल्याचा एक समज मोदींबाबत आता लोकांचा झालेला आहे. पूर्वी तिकीट स्वस्त होते, आता लोकांचा जीव स्वस्त झाला - पटोले पटोले म्हणाले- पण आजची घटना पाहता लोक कसे गाडीतून उडी मारत आहेत. आणि ते कसे मृत्यूमुखी पडत आहेत. हे कवच योजना फक्त दाखवण्यासाठी राहिलेली आहे. ही केवळ सरकारची जुमलेबाजी आहे. आमच्या काळात रेल्वेचे तिकीट स्वस्त होते. परंतु मोदी सरकारच्या काळात सामान्य नागरिकांचा जीव स्वस्त झालेला आहे. सामान्य, गरीब आणि निर्दोष लोकांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात रेल्वे अपघातात होत असल्याचेही नाना पटोले म्हणालेत. सरकारने रेल्वे अपघातांची जबाबदारी स्विकारावी लाल बहादूर शास्त्रींच्या काळातही असाच एक अपघात झाला होता. त्यावेळी त्यांनी तात्काळ आपला राजीनामा दिला होता. आत्ताच्या रेल्वेच्या अपघाताच्या घटना पाहता जर मोदी सरकारमध्ये धमक असेल तर मोदींनी आपला राजीनामा द्यावा.
जशी जबाबदारी ही लाल बहादुर शास्त्री यांनी स्विकारली होती. तशीच या अपघाताची जबाबदारी ही सरकारने स्विकारावी. हे केवळ एकट्या रेल्वेमंत्र्यांचे अपयश नसून संपूर्ण केंद्र सरकारचे अपयश असल्याचेही पटोले म्हणाले. या संबंधित ही पण बातमी वाचा... लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा, प्रवाशांनी उड्या मारल्या:दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या ट्रेनने चिरडले; 11 ठार, 40 जण जखमी कर्नाटक एक्सप्रेसने पुष्पक एक्सप्रेसच्या अनेक प्रवाशांना उडवल्याची भयंकर घटना बुधवारी सायंकाळी 4 च्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकालगत घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक लावल्यामुळे तिच्या चाकांमधून ठिणग्या उडल्या होत्या. त्यानंतर रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी जिवाच्या आकांताने खाली उड्या मारल्या. पण त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले. त्यात 11 जण ठार, तर 40 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर बातमी...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)