परभणी/ताडकळस (Tadkalas Police Station) : येथील पोलिस ठाण्यास नांदेड पोलिस परिक्षेत्रातुन विशेष कामगिरी केल्याबद्दल तिसरा क्रमांक मिळाला आहे.याबद्दल पोलिस ठाण्याचे ठाणेदार, पोलिस उपनिरीक्षक,बिट जमादार व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
नांदेड पोलिस परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातुर या चार जिल्ह्यांतील एकुण ९१ पोलिस ठाण्याची नोव्हेंबर २०२४ या महिन्यात नांदेड पोलिस परिक्षेत्राच्या वतीने तपासणी करण्यात आली. या तपासणीत (Tadkalas Police Station) ताडकळस पोलिस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल परिक्षेत्रातुन तिसरा क्रमांक मिळाला आहे.याबद्दल नांदेड पोलिस परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शाहजी उमाप यांनी पोलिस ठाण्यास प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
या यशाबद्दल सपोनि.गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे, सर्व बिट जमादार व पोलीस कर्मचारी, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस पाटील, (Tadkalas Police Station) पोलिस मित्र यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.