चार दिवसांआधी अजित पवारांनी आपल्याला फोन केला आणि उशीर झाल्याचं सांगून दिलगीरी देखील व्यक्त केल्याचं सांगत आपण चर्चा करू, असं अजित दादा म्हणाले असं छगन भुजबळ यांनी सांगितलंय.
छगन भुजबळ यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मंत्रिपदावरुन नाराजी दूर झाल्याबद्दल भाष्य केले. विशेष म्हणजे छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्य राष्ट्रवादीत नाराज असलेले आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेणाऱ्या छगन भुजबळांनी मोठा खुलासा केलाय. चार दिवसांपूर्वी अजित पवारांचा फोन आला असं म्हणत उशिरा फोन करतोय म्हणून दिलगीरी व्यक्त करत बसून बोलू असं दादा म्हणाल्याचं भुजबळांनी सांगितलं. मंत्रीपद न मिळाल्याने भुजबळ नाराज झाले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या अजित पवारांऐवजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीगाठी घेतल्या. दोन दिवसांआधी ही भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. ‘माझी जिथे गरज नाही तिथे मी काही जात नाही’, असं छगन भुजबळ म्हणाले. तर छगन भुजबळांवरून मार्ग काढू असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यापासून प्रफुल्ल पटेल म्हणत होते. आता स्वतः अजित दादांनीच फोन केल्याचं भुजबळ यांनी सांगितलं त्यामुळे भुजबळांवरून कोणता सुवर्णमध्य निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान, छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाले होते. “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय नि फेकलं काय… कोणाला काय फरक पडतो. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, परंतु हा छगन भुजबळ संपला नाही. तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं”, असे छगन भुजबळ म्हणाले होते. यानंतर ते सातत्याने वेगळी भूमिका मांडताना दिसत आहेत.
Published on: Feb 07, 2025 11:42 AM