आम्हालाही बिबट्याला मारू द्या, असं म्हणत बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, यासाठी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
बिबट्याचे मानव आणि पशुधनावर हल्ले वाढत असल्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहे. त्यामुळे बिबट्या माणसाला मारतो, आता आम्हालाही बिबट्याला मारू द्या, असं म्हणत बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, यासाठी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. संगमनेर आणि राहाता तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात लहान बालकांचा तसेच नागरीकांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना, बातम्या समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्या माणसांना मारू शकतो, मात्र माणसं बिबट्याला मारू शकत नाही. बिबट्यांची संख्या हजारोंनी वाढली आहे तरी बिबटयाचा समावेश संपलेल्या प्रजातीमध्ये आहे, असं सुजय विखे पाटील म्हणाले. बिबट्याचे मानवावर आणि पशुधनावर होणाऱ्या हल्ल्यांचा विचार करता मानवालाच बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुजय विखे पाटील यांनी दिली. ‘बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, याबाबत मी जनहित याचिका दाखल करणार असून त्यासंदर्भातील अभ्यास पूर्ण होत आहे. या याचिकेमध्ये माणसाला मारायला बिबट्यांना परवानगी आहे पण बिबट्यांना मारायला माणसाला परवानगी नाही. या विषयावर मोठ्या वकिलांचे सल्ले घेत आहे. मला विश्वास न्यायालय याचा विचार करेल’, असं सुजय विखे पाटील म्हणाले.
Published on: Feb 07, 2025 02:15 PM