दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यात अतिशय चुरशीची लढत दिसत आहे.
5 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं असून आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले होते. 2020 च्या तुलनेत यावेळी दिल्लीत 2 टक्के कमी मतदान झाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यात अतिशय चुरशीची लढत दिसत आहे. आप 15 तर भाजप 26 जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेस फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. मात्र असं असलं तरी दिल्लीचे आजी-माजी मुख्यमंत्री सध्या पिछाडीवर आहेत. विद्यमान मुख्यमंत्री आतिषी तसेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुरूवातीपासूनच पिछाडीवर आहेत.
Published on: Feb 08, 2025 08:56 AM