नागपूर (Nagpur) :- महापालिकेद्वारे तक्रारींसाठी तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या तक्रार निवारण हेल्पलाईनचे मुख्यमंत्री (chief minister) देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या हस्ते शुक्रवारी ‘रामगिरी’ येथे लोकार्पण करण्यात आले. तक्रार निवारण हेल्पलाईनद्वारे आता नागरिकांना १५५३०४ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदविता येणार आहे.
तक्रार निवारण हेल्पलाईनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रामगिरी’ येथे लोकार्पण
हेल्पलाईनच्या लोकार्पणप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त विजय देशमुख, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे आदी उपस्थित होते. महापालिका तक्रार निवारण क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक फोनची दखल घेऊन नोंदविण्यात आलेली तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांकडून अभिप्रायदेखील मागविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मुख्यमंत्री महोदयांना दिली. शहरातील नागरिकांच्या विविध तक्रारी सोडविण्याच्या कामात गती प्रदान करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेमुळे तक्रार निवारणाच्या कार्यामध्ये गती देईल, असा विश्वास मनपा आयुक्त (Municipal Commissioner) तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या तक्रारींसाठी नागरिकांनी नागपूर महानगरपालिकेच्या १५५३०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन आपल्या तक्रारीशी संबंधित माहिती द्यावी. ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे तक्रार निवारण पोर्टल तसेच ‘माय नागपूर अॅपची सुविधा यापूर्वी उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधांमध्ये आता थेट फोन करून तक्रार नोंदविण्याची देखील सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये चमू तैनात करण्यात आली आहे.