दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Election) उद्या बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत ‘आप’ (Aap), काँग्रेस (Congress) व भाजप (Bjp) असा तिरंगी सामना रंगणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी सहा नंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ‘आप’ व काँग्रेसला ट्विटरवरून एक आवाहन केले आहे.
””आम आदमी पार्टी व काँग्रेस या दोन्ही पक्षांना मी आवाहन करतो की त्यांनी उद्या होणाऱ्या मतदानाच्या वेळी निवडणूक आयोगावर Entirely Compromised (EC) बारीक लक्ष ठेवा. आपल्या मालकासाठी निवडणूक आयोग मतदार घोटाळे, बोगस मतदार असे प्रकार घडू देत त्यावर लक्ष ठेवा. गरज वाटल्यास सोबत व्हिडीओ कॅमेरा ठेवा. त्यामुळे आपल्या मालकाच्या फायद्यासाठी मतदान संपत आलेले असताना अचानक वाढणाऱ्या मतदानावर लक्ष ठेवता येईल व खऱ्या मतदारांचा आकडा समोर येईल. फक्त मुक्त व प्रामाणिक मतदान हेच मतदांरांचा खरा सन्मान आहे. आणि त्यानंतर खऱ्या मतदारांनी निवडून दिलेला जो काही निकाल असेल तो, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.