अंगणवाडीतील मुलाची बिर्याणी, चिकन फ्रायची मागणी...; केरळ सरकार घेणार मोठा निर्णय Pudhari
Published on
:
04 Feb 2025, 11:01 am
Updated on
:
04 Feb 2025, 11:01 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: केरळमधील एका अंगणवाडी केंद्रात उपमाऐवजी बिर्याणी आणि चिकन फ्राय मागणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आता बालसंगोपन केंद्रांच्या मेनूमध्ये बदलाची चर्चा होत आहे. यावर आता केरळ सरकार देखील मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केरळच्या आरोग्य, महिला आणि बाल कल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी सोमवारी (दि.४) त्यांच्या फेसबुक पेजवर शंकू नावाच्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो मुलगा त्याचे आवडते पदार्थ मागत आहे. यावरून आता अंगणवाडीच्या मेनूमध्ये बदलाची चर्चा आहे. मंत्र्यांनी सांगितले की, "मुलाने ही विनंती अतिशय निरागसपणे केली आहे आणि आता त्यावर विचार केला जात आहे".
जॉर्ज म्हणाल्या की, मुलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी अंगणवाड्यांद्वारे विविध प्रकारचे अन्न पुरवले जाते. या सरकारच्या काळात अंगणवाड्यांद्वारे अंडी आणि दूध देण्याची योजना यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, टोपी घातलेला मुलगा त्याच्या आईला निरागसपणे विचारताना ऐकू येतो की, "त्याला अंगणवाड उपमा खायचा नाही तर.. ऐवजी 'बिर्याणी' आणि 'पोरीचा कोळी' (चिकन फ्राय) हवे आहे".
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या व्हिडिओने लवकरच केरळच्या आरोग्य, महिला आणि बालविकास मंत्री वीणा जॉर्ज यांचे लक्ष वेधून घेतले. शंकूच्या विनंतीने प्रभावित झालेल्या मंत्र्यांनी सांगितले की अंगणवाडी मेनूचा आढावा घेतला जाईल आणि त्यात बिर्याणीचा समावेश केला जाईल. मंत्री जॉर्ज यांनी शंकू, त्यांची आई आणि अंगणवाडी सेविकांना यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.