MSP for Soybean: बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांच्या हस्ते शुभारंभ
देवळा येथे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करताना बाजार समितीचे सभापती योगेश आहेर समवेत संघाचे संचालक मंडळ व शेतकरी आदी. छाया -सोमनाथ जगताप
Published on
:
04 Feb 2025, 1:44 pm
Updated on
:
04 Feb 2025, 1:44 pm
देवळा : देवळा येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने मंगळवारी दि. ४ रोजी आधारभूत किमतीत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांच्या हस्ते करण्यात आला . या शुभारंभ प्रसंगी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणला होता . एनसीसीएफ या संस्थे मार्फत शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य सहकारी पणन महासंघ यांच्या वतीने देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघामार्फत सोयाबीन , मुंग व उडीदचा शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीत खरेदीचा येथे शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटलने सोयाबीनची खरेदी करण्यात आली . या शुभारंभ प्रसंगी संघाचे चेअरमन संजय गायकवाड , संचालक चिंतामण आहेर ,अमोल आहेर , सचिन सूर्यवंशी , हंजराज जाधव ,बाळासाहेब मगर , डॉ. किरण आहेर , भावराव नवले ,नानाजी आहेर , विनोद देवरे ,सुनील पवार , सचिव गोरख आहेर आदी उपस्थित होते.