सध्या टिव्हीवर अनेक रिअॅलिटी शो सुरु आहेत. त्यापैकी जास्त चर्चेत असणारा शो म्हणजे ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’. या शोने काही दिवसांमध्ये चांगली पसंती मिळवली आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आवडीने सहभाग घेतला आहे.
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ शो मध्ये दीपिका कक्कर, तेजस्वी प्रकाश, अनुपमा शोमधील गौरव खन्ना, मिस्टर फैजू, निक्की तांबोळी, उषा नाडकर्णी आणि इतर काही प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. या शोमध्ये मनोरंजन विश्वातील हे सेलिब्रिटी चक्क जेवण बनवतात आणि जज तो पदार्थ चाखून त्यांना मार्क्स देतात.
उषाताईंनी केलेला पदार्थ चाखण्यास जजचा नकार
जसजसा हा शो पुढे जाईल तसतसा या शोमध्ये प्रचंड ड्रामा पायाला मिळत आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये जज शेफने मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी केलेला पदार्थ चाखण्यास नकार दिला आहे. त्यावेळी उषाताईंनी दिलेलं उत्तर पाहून नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं आहे.
पदार्थ कच्चा असल्याचं म्हणत जजने उषाताईंना सुनावलं
शोच्या निर्मात्यांनी अलीकडेच ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ चा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जजने उषा नाडकर्णी यांनी बनवलेला पदार्थ चाखण्यास नकार दिला आहे. या व्हिडीओमध्ये, फराह खान उषा नाडकर्णी यांना विचारते की त्यांनी काय बनवलं आहे? तर त्या उत्तर देत म्हणल्या, चिकन सुका. यानंतर जेव्हा जज त्यांनी बनवलेला चिकन सुका चाखतात तेव्हा ते खाण्यास नकार देतात. तेव्हा उषा विचारतात, “काय झाले?” फराह म्हणते की, “हे चिकन पूर्णपणे कच्चे आहे. यावर रणवीर ब्रार म्हणतो जर कोणी हे चिकन खाल्लं तर आपण आजारी पडू.” यावर उषा म्हणतात की त्यांनी मी चाकू घालून ते चिकन शिजलं की नाही हे चेक केलं आहे. यावर फराह म्हणते, “जेव्हा शेफ तुम्हाला सांगेल तेव्हाच तुम्ही ऐकत का नाही. यावर उषाताई उत्तर देतात. तेव्हा फराह थोडी रागानेच उत्तर देत म्हणली की, “तुम्ही कधीकधी ऐकत नाही”.
उषा ताईचं उद्धट उत्तर ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांचा उषाताईंचा राग येत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे. “उषा ताई खरोखरच खूप चिडखोर आणि स्पष्टवक्त्या आहेत. आपण त्यांच्या वयाचा आदर करतो, पण त्यांनीही सर्वांचा आदरही केला पाहिजे”, तर, आणखी एकाने लिहीले आहे की, “त्या नेहमीच वयस्कर असल्याचं कार्ड वापरत खेळण्याचा प्रयत्न करतात” असं म्हणत त्यांच्यावर भडकले आहे.