सहा आरोपी अटक करून त्यांच्याकडे तपास करण्यात आला. त्यामध्ये फरहान शेख याला बनावट व चोरून रबरी शिक्के तयार करून देणारा दर्शन शहा याला अटक करून त्याच्याकडून नऊ रबरी स्टॅम्प व मशिन जप्त करण्यात आली. तसेच, रेशनकार्ड देणारे पिराजी शिंदे, गोपाळ कांगणे यांनाही अटक झाली. त्यांच्याकडून 95 संशयित रेशनकार्ड, 11 बनावट आधार कार्ड, मोबाईल हँडसेट, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
संतोषकुमार तेलंग याने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबानंतर फरहान शेख, अॅड. अस्लम सय्यद यांची नावे निष्पन्न झाली. या कारवाईत पोलिस अंमलदार अमोल पिलाणे, दया शेगर, महेश गाढवे, सर्फराज देशमुख, अतुल गायकवाड, सोमनाथ कांबळे यांनी सहभाग घेतला.
वकिलांना अटक केल्याचा निषेध
बनावट जामीन घोटळ्यात वकिलांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वकील वानवडी कोर्ट आवारात जमा झाले होते. त्यांनी या वेळी वकिलांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला.
सहभागी असणारे रडारवर
सध्या या बोगस जामीनदाराची 24 प्रकरणे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या जामीन घोटाळ्यात आणखी सहभागी असणारे यानिमित्त रडारवर आले आहेत. बनावट जामीनदार तसेच बोगस खरेदीखते यामध्येही बनावट जामीनदार उभे केले असण्याची शक्यता पाहता, चौकशी होण्याची शक्यताही यानिमित्त वाढली आहे.
गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन देण्यासाठी बोगस जामीनदार मुंबई, ठाणे तसेच ग्रामीण भागातून बोलावून त्यांची बनावट कागदपत्रे बनविल्याचे निष्पन्न झाले आहे. कोर्टाच्या नाझरला हाताशी धरून वकिलांनी न्यायालयाने भरण्यास सांगितलेल्या जातमुचलक्याच्या ठरलेल्या किमतीइतकी रक्कम गुन्हेगारांच्या नातेवाइकांकडून उकळली जात होती. ही रक्कम घेतल्यानंतर त्यातील काही रक्कम बनावट जामीनदारांना वाटून उर्वरित रक्कम वकील आपल्याकडे ठेवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
- राजकुमार शिंदे, पोलिस उपायुक्त