मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे खाते प्रत्यक्षात वाल्मीक कराड चालवत होता, असा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. धनंजय मुंडेंचं खातं वाल्मीक कराडच चालवत होता. जे प्रस्ताव देण्यात आले त्याला मुख्यमंत्री यांनीही सहमती दिली. त्यामुळे यात सरकार देखील सहभागी आहे का? असा सवाल उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. सरकार खून करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभं राहित. धंनजय मुंडे वृत्तीमुळे सरकारची प्रतिमा बदनाम होत असल्याने मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असेही अंबादास दानवे यांनी ठणकावले. सरकारने धंनजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे,अन्यथा अधिवेशन पुढे जाणार नाही, असा इशाराही अंबादास दानवे यांनी सरकारला दिला आहे.
सरकार खून करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभं आहे, भ्रष्टाचार करणाऱ्याना पाठीशी घालणारे सरकार आहे. धंनजय मुंडे वृत्तीमुळे सरकारची प्रतिमा बदनाम होत असल्याने मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अंजली दमानिया यांनी काही गोष्टी उघड केल्या आहेत. धंनजय मुंडे यांच्या दबावाखाली अधिकारी काम करू शकले नाहीत. वाल्मीक कराडच धनंजय मुंडे यांचे खातं चालवत होता. लाडकी बहीण योजनेवरूनही अंबादास दानवेंनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने लाडकी बहिणी योजनाखाली निवडणुकीत लाच दिली होती. निवडणूक संपल्यावर यांना अटी शर्ती आठवत आहे. संजय गांधी सारख्या योजनांचा लाभ घेणाऱ्याना देखील लाभ मिळणार नाही’ असंही ते म्हणाले.
तीन लाखाचे काम मंजूर होण्यासाठी चार महिने लागतात, पण या प्रकरणात DBT बाजूला करण्यात आली.सरकारची फसवणूक मंत्री आणि या विभागाने केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा घोटाळा झाला, यात कुणाचा तरी आशीर्वाद आहे. हा सर्व ठरवून केलेला प्रकार आहे. जनता आणि आम्ही विरोधी पक्ष देखील जबाब विचारणार आहोत. ही राज्याची फसवणूक आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यानंतर राजीनामा घ्यावा असं अंबादास दानवे म्हणाले.