दहेगाव शिरोली दरम्यानची घटना
देशोन्नती वृतसंकलन
घाटंजी (Bus Accident) : तालुक्यातील घाटंजी घोटी रस्ता हा अपघाताचा रस्ता झाला असून दर आठवडायला या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु झाली आहे. घाटंजी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या घाटंजी दहेगाव राज्य मार्गावर दहेगाव शेतशिवारात एसटी महामंडळाची किनवट आगाराची बस क्र. एम एच २० बि एल १९८१ किनवट ते घाटंजी मार्गे यवतमाळ जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकीने (Bus Accident) बसवर गेल्याने एक जण जागीच ठार झाला. अपघात सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडला या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मृतकाचे नाव नंदु मिस्टीम चव्हाण वय २५ वर्ष रा.जळका तालुका राळेगाव असे आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता किनवट वरून मांडवी पाटापांगरा, घोटी मार्गे घाटंजी जात असतांना दहेगाव शेतशिवारात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास वाचविण्यासाठी बस चालकाने बस रोडच्या कडेला उतरवितांना (Bus Accident) बस चालकांचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या बाजूला खाली उतरली तेव्हा समोरून आलेल्या दुचाकीस्वाराला जबर धडक बसल्याने सदर युवक जागीच ठार झाला.
तसेच बसमध्ये बसून असलेल्या (Bus Accident) प्रवाशांना झटका बसल्याने समोरच्या सिटवर आदळले. यातील काही प्रवासी जखमी झाले तेव्हा जखमींना रूग्णालयात उपचारासाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले यामध्ये गजानन पु. मानकर, सृष्टी लिंगनवार, राधाबाई हलवले, आशा पवार, रमेश पवार, बाबुलाल चव्हाण, कोचीराम दोंतुलवार, लिलाबाई आत्राम, वामन डंभारे, प्रेमीला राठोड, वामन अवधुतकार, अरूण राठोड, देविदास राठोड हि जखमी प्रवाशांची नावे आहेत. यातील गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे.
या (Bus Accident) अपघातात सदर घटनेतील बस चालकाने घाटंजी पोलीसात फिर्याद दाखल केली या घटनेची माहिती घाटंजी पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळावरून बस घाटंजी पोलीस ठाण्यात लावण्यात आली नाही. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविण तालकोकुलवार व धनंजय मडावी करीत आहेत.