परभणी/गंगाखेड (Minor Abduction) : इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना शहरात घडली असुन याप्रकरणी सोमवार ३ फेब्रुवारी रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा (Minor Abduction) गुन्हा दाखल करण्यात आळा आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की इयत्ता अकरावी वर्गात शिकणारा गणेश पंडीत नागरे वय १७ वर्ष २ महिने रा. ज्ञानेश्वर नगर गंगाखेड हा दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शाळेत जातो म्हणून घरून गेला मात्र तो घरी परत आला नाही. यावरून त्याच्या आई, वडिलांनी नातेवाईक व मित्रांकडे शोध घेतला तरी त्याचा काही एक पत्ता लागला नसल्याने सोमवार ३ फेब्रुवारी रोजी आई अंजनाबाई पंडीत नागरे, वडील पंडीत गोविंद नागरे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात धाव घेवून मुलगा गणेश नागरे यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कोणते तरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिल्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा (Minor Abduction) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गित्ते, जमादार मारोती माहोरे, पो. शि. राजु परसोडे हे करीत आहेत.