पिडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल
परभणी शहरातील घटना
परभणी (Girl battle Case) : मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५ वर्षीय अल्पवयीन शाळकरी (Girl battle Case) मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ या दरम्यान परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणे हद्द परिसरात घडली. पिडितेने दिलेल्या तक्रारी वरून आरोपीवर २ फेब्रुवारीला नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, (Girl battle Case) शाळेत जात असतांना आरोपींने तीचा पाठलाग केला. तसेच माझ्या सोबत प्रेम कर म्हणून बळजबरी केली. पिडितेने नकार दिल्यावर आरोपीने हाताची नस कापून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पिडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेत तीच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या दरम्यान आरोपीने दोघांचे मोबाईलमध्ये फोटो काढले.
सदर फोटो व्हायरल करतो असे म्हणत धमकी देऊन परभणी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी नेत (Girl battle Case) अत्याचार केला. सदर प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून नवनाथ भंगे याच्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.