Delhi Election Result 2025 : भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत. दिल्लीत आपचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूने आहेत. आता काँग्रेस, आप चूक सुधारतील का?
दिल्ली निकालातून काँग्रेस धडा घेणार? धडा शिकवणार?
देशाच्या राजधानीत भाजपाचे कमळ फुलत असल्याचे सुरुवातीच्या कलामध्ये समोर येत आहे. येणारे कौल हे आपसाठी धक्कादायक आहेत. भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत. दिल्लीत आपचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूने आहेत. आता काँग्रेस, आप चूक सुधारतील का?
कलांनी AAP ची उडवली झोप
दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. पोस्टल मतमोजणीत आणि आता ईव्हीएममधील मतमोजणीचा कल सुद्धा भाजपाच्या बाजूने दिसत आहे. दिल्लीकरांनी आपला तिसऱ्यांदा संधी देण्यास नकार दिल्याचे दिसून येते. अर्थात आप अजूनही मैदानात आहे. तरीही भाजपाने मारलेली मुसंडी, ही सत्तेचा वनवास संपणारी दिसत आहे.
हे सुद्धा वाचा
कलामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष
कलानुसार, दिल्लीत कमळ फुलणार हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या साईटनुसार, 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. यामध्ये भाजप 42 जागांवर तर आप 27 जागांवर तर दुसरीकडे काँग्रेसचे सर्वात वाईट प्रदर्शन म्हणजे केवळ एका जागेवर काँग्रेस दिसत आहे. दिल्लीकरांनी विधानसभा निवडणुकीत आपकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. आपचे प्रमुख तीन नेत्यांमध्ये मनिष सिसोदीया हे आघाडीवर तर आतिषी आणि अरविंद केजरीवाल हे पिछाडीवर दिसत आहेत.
बातमी अपडेट होत आहे…