Published on
:
08 Feb 2025, 5:55 am
Updated on
:
08 Feb 2025, 5:55 am
जळगाव | रेल्वेतून एसी कोच मधील लेडीज पर्स चोरी करणारे परराज्यातील तीन आरोपीच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून १८ लाख ०६ हजार १८९ रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहमार्ग पोलीस ठाणे भुसावळ येथे आंध्रप्रदेश मधील कापुस्ट्रीट नेल्लोर सिटी येथील फिर्यादी दिलीपकुमार प्रथापचंद जैन, वय ५७ वर्ष यांनी गुन्हा दाखल केला होता. ३० डिसेंबर २०२४ रोजी ट्रेन नं. १२६५५ डावुन नवजीवन एक्स.चे कोच नं. ए/२ बर्थ नं. १९, २० वरून रेल्वे स्टेशन अहमदाबाद ते नेल्लोर असा त्यांच्या पत्नी सह प्रवास करीत असता प्रवासात रेल्वे रे.स्टे भुसावळ येथुन गाडी सुटताच लक्षात आले की त्याच्या पत्नीची लेडीज पर्स त्यात लेडीज हॅण्ड बॅग त्यात १ लाख ६० हजार किमतीचे दोन नेकलेस सेट वजन ८० ग्रॅम , ६० हजार रूपये किमतीचे दोन इअरिंग सेट वजन ३० ग्रॅम , ७०हजार रूपये किमतीचे तिन फिंगर रिंग्स (अंगठी) वजन ३५ ग्रॅम १ लाख रुपये किमतीचे एक हात कंगन वजन ५० ग्रॅम १लाख ६० हजार रुपये किमतीचे एक बॅगल सेट (बांगळ्या) वजन ८० ग्रॅम असे एकुण २७५ ग्राम वजन असलेले ५लाख ५० हजार रूपये किमतीचे सोने , ८० हजार रुपये रोख २ हजार रुपये किमतीचा एक मोटोरोलो कंपनी चा मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ३२ हजार रुपये किमतीचा माल. असलेली पर्स कोणीतरी अज्ञात चोरट्याने झोपेचा फायदा घेवुन मुद्याम लबाडीने चोरून नेली बाबत फिर्यादी यांनी रे.पो.स्टे. नेल्लोर येथे दिले तक्रारवरून गुन्हा वर्ग होवून प्राप्त झाल्याने नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासात . पोलीस अधिक्षक . स्वाती भोर , . उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्यकांत बांगर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर, सपोनि किसन राख, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी पांचुराम मिना, दयानंद यादव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे जयकुमार रमेश कोळी, रविंद्र पाटील, दिवानसिंग राजपुत, धनराज लुले, विलास जाधव, पो.कॉ.बाबु मिर्झा तसेच रेल्वे सुरक्षा बल भुसावळ चे प्रधान आरक्षक महेंद्र कुशवाह, दिपक सिरसाठ, ईमरान खान यांनी मिळालेल्या गुप्त बातमीवरुन व सिसिटिव्ही फुटेज ची पाहणी करुन गुन्हा घडल्यानंतर दिड महिण्यानंतर रेल्वे स्टेशन भुसावळ येथे पकडले . आरोपी रमजान खान हुसेन खान वय 35 तो सिफ खान चिन्मन खान वय 22 मुस्ताक खान मुस्तफा खान व 18 सर्व राहणार नेपानगर यांना अटक करून PCR घेवुन तपासात याचे कड्डुन नमुद गुन्हयातील चोरीस गेलेला सोन्याचे दागीने एकुण २३४.५७० ग्रॅम वजनाचे आजचे बाजारभावाप्रमाणे किंमत १८ लाख ०६ हजार १८९ रूपये माल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास जयकुमार रमेश कोळी व गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पथक करीत आहे.