देवळाली : मतदारसंघात प्रचार दाैऱ्याप्रसंगी जनतेने दिलेले धनुष्यबाण उंचावताना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. राजश्री अहिरराव.file
Published on
:
16 Nov 2024, 6:48 am
Updated on
:
16 Nov 2024, 6:48 am
नाशिक : रेशनकार्ड हा गरिबांचा पासपोर्ट असून, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. राजश्री अहिरराव यांनी नागरिकांना मोफत रेशनकार्ड वाटप केले. या माध्यमातून महिलांना लाडकी बहीण योजना तसेच रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचाराला मदत मिळत आहे. त्यामुळे डॉ. अहिरराव यांना महिलांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. देवळालीच्या सर्वांगिण विकासाकरिता अहिररावांना मतदारांची पहिली पसंती मिळत असून, त्यांना निवडून देण्याचा निर्धार जनतेने केला आहे.
देवळाली मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. राजश्री अहिरराव यांनी शुक्रवारी (दि.१५) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर शहरातून प्रचार दौऱ्याचा शुभारंभ केला. शिवसेना उपनेते विजय करंजकर यांच्या निवासस्थानी भेट दिली असता करंजकर कुटुंबीयांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी विजय करंजकर यांच्या नेतृत्वात भगूर गावातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर विजयनगर, शिंगवेबहुला, देवळाली कॅम्प, देवळाली गाव, राहुरी दोनवाडे भागात प्रचार रॅली पोहोचली. डॉ. अहिररावांना शिंदे गटाने पाठिंबा दिल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेला शिवसैनिक देवळाली मतदारसंघामध्ये विजयाचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रचार रॅलीदरम्यान गावागावांमधून सभांचे आयोजन करण्यात येत आहे. याप्रसंगी डाॅ. अहिरराव जनतेशी संवाद साधताना त्यांच्या विकासासंदर्भातील त्यांच्या अपेक्षा व योजना जाणून घेत आहेत. प्रचार रॅलीमुळे गावागावांमधील वातावरण भगवेमय झाले आहे.
तहसीलदारताई तसेच रेशनकार्डवाली बाई म्हणून डॉ. अहिरराव मतदारसंघात परिचित आहेत. त्यांच्या प्रचार दौऱ्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काही जणांकडून रेशनकार्ड शिबिरे राबवले म्हणजे मतदारसंघाचा विकास झाला का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पण या आरोपांना जनतेमधूनच उत्तर मिळते आहे. नागरिकांची गरज लक्षात घेत अहिरराव यांनी गावोगावी शिबिरे राबवून मोफत रेशनकार्ड मिळवून दिले. त्यामुळे जनआरोग्य व लाडक्या बहिणीसारख्या योजनांचा लाभ मिळू शकल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. सुसंस्कृत चेहरा, विकासाची दूरदृष्टी, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या डॉ. राजश्री अहिरराव यांनाच यंदा विधानसभेत पाठविण्याचा निर्धार मतदारांकडून व्यक्त केला जात आहे.