कंटेनर मध्ये कप्पा करून दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
Published on
:
17 Nov 2024, 3:14 am
Updated on
:
17 Nov 2024, 3:14 am
धुळे |कंटेनरमध्ये पार्टिशन करून मेंढीच्या लोकरीच्या गाठोडयांच्या आडोशाने दारूची तस्करी करणाऱ्या आधुनिक पुष्पाला बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना यश आले आहे. या कारवाईत सुमारे 40 लाखाची दारू आणि बियर जप्त करण्यात आली असून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना या दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. डाक पार्सलचे कंटेनर क्रमांक-आरजे -32/जीए-5956 हिचेत विदेशी दारु व बिअर भरुन पिंपळनेर-ओटाबारी मार्गे राजस्थान कडुन पालघर कडे जात आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक रवाना झाले.
पथकाने पाठलाग करुन उंबरपाटा चौफुली (पिंपळनेर) येथे कंटेनर थांबविले. हे कंटेनर श्री मेहंदीपुर बालाजी कंटेनर डाक पार्सलचे होते. कंटेनर ड्रायव्हरने त्यात मेंढीचे लोकर असल्याचे सांगितले. बातमीची खात्री करण्याकरिता कंटेनरची सखोल तपासणी केली असता कंटेनरचे मध्यभागी पत्रटी पार्टीशन केले होते. अलीकडील कप्प्यात मेंढीचे लोकरचे गाठोडे होते. ड्रायव्हर शीटच्या मागे सनमाईकाचे शिट व त्यातील डिझाईन मध्ये एक 2 बाय 2 फुटाची खिडकी उघडुन तपासणी केली असता कंटेनर मधील छुपा कप्प्यामध्ये आणि कॅबीनचे वरील कप्यात बॉक्समध्ये विदेशी दारुच्या बाटल्या व बिअरचे टिन मिळुन आले. त्याबाबत चालकास विचारणा केली असता, त्याने त्याचे नाव सोहनलाल चौथमल प्रजापती, (रा. कुकरखेडा, राजस्थान) व क्लिनर दौलतसिंह मोहनसिंह राजपुत,( रा.मंडावर, राजस्थान) असे सांगीतले. तसेच सदर विदेशी दारु व बिअर ही फक्त राजस्थान राज्यात विक्रीसाठी असुन, मनोर पालघर येथे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली. सदर कंटेनरमध्ये
एकुण 20 लाख 16 हजार रु.किंमतीची विदेशी दारु व बिअर आणि 22 लाख किं.चा कंटेनर असे एकुण 42 लाख 16 हजार रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.