Gangakhed Accident: आयशर व शालेय विद्यार्थ्यांच्या ऑटो अपघात; एक जण जागीच ठार

1 hour ago 1

तिहेरी अपघात झाल्याची प्रत्यक्ष दर्शींमध्ये चर्चा

परभणी/गंगाखेड (Gangakhed Accident) : परभणी रस्त्यावर शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी अंदाजे दोन वाजेच्या सुमारास झालेल्या आयशर टेम्पो व शालेय विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या टाटा छोटा हत्ती ऑटोचा समोरासमोर अपघात झाल्याने ऑटो चालक जनार्धन शेषराव आंधळे यांचा जागीच मृत्यु झाला आहे. अपघात स्थळाची पाहणी केली असता सदर अपघात आयशर टेम्पो, शालेय विद्यार्थ्यांची ने आण करणारा ऑटो व एक कार यांच्यात तिहेरी अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शीच्या चर्चेतून समोर आली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांना परभणी रस्त्यावरील खळी येथे सोडून गंगाखेडकडे परत येणारा टाटा कंपनीचा छोटा हत्ती ऑटो क्रमांक एमएच ४४ जी २९४८ व गंगाखेड येथून परभणीकडे जाणारा आयशर टेम्पो क्रमांक एमएच ०४ जीआर ३५९७ यांच्यात महातपुरी फाट्यापासून जवळच परभणी रस्त्यावर समोरासमोर झालेल्या अपघातात छोटा हत्ती ऑटो चालक जनार्धन शेषराव आंधळे वय ३८ वर्ष रा. झोला. हमु. गंगाखेड हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच खाजगी रुग्णवाहिका चालक दिगंबर कदम, बाबा साळवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी ऑटो चालक जनार्धन शेषराव आंधळे यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य मुळे, अधिपरीचारिका पल्लवी माने, अंकिता कदम यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. या अपघाता दरम्यान ऑटोमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे मोठी जिवीत हानी टळल्याची चर्चा घटनास्थळी होत होती. गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई शंकर गयाळ, गृहरक्षक दलाचे जवान राठोड, शिसोदे, गाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमलेली गर्दी कमी केली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आयशर चालक फरार

अपघाताची घटना घडल्यानंतर आयशर चालकाने त्याचा टेम्पो घटनास्थळापासून सुमारे १०० मिटर अंतरावर थांबविला येथून ये करणाऱ्या वाहन धारकांनी आयशर टेम्पोत फसलेल्या चालकाची कॅबिन मधून सुटका केली तेंव्हा किरकोळ जखमी झालेला टेम्पो चालक शासकीय रुग्णालयात येण्या ऐवजी खाजगी रुग्णालयात जाऊन फरार झाल्याचे तसेच हा अपघातात छोटा हत्ती ऑटो, आयशर टेम्पो व एका कार अशा तीन वाहनाचा समावेश असल्याचे व कार चालकाने कार सह घटना स्थळावरून पळ काढल्याची चर्चा अपघातस्थळावर जमलेल्या काही प्रत्यक्ष दर्शींमध्ये होत होती.

ऑटोच्या कॅबिनचा चुराडा

हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या ऑटोच्या कॅबिेनचा पूर्णपणे चुराडा होऊन चालक जनार्धन आंधळे हा इसम एका दिशेला तर ऑटो दुसऱ्या दिशेला जाऊन पडला होता. आयशर टेम्पोच्या कॅबिेनचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटना स्थळावरून फरार झालेल्या कारचे ही समोरील बाजूचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article