Gangakhed Assembly Elections: निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 9 लाखांचा मुद्देमाल जप्त; संशयीत मात्र फरार

2 days ago 1

मतदानाची वेळी स्कार्पिओ, दोन दुचाकीसह सहा धारदार शस्त्र पकडली

परभणी/गंगाखेड (Gangakhed Assembly Elections) : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. १८ नोव्हेंबर रोजी रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी एक स्कार्पिओ वाहन व दोन दुचाकीसह सहा धारदार शस्त्र पकडत एकुण ९ लाख ३६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील संशयीत मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाले असुन विधानसभा निवडणूक मतदानाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, (Gangakhed Assembly Elections) गंगाखेड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गंगाखेड पोलीस ठाण्यातील सपोनि, शिवाजी सिंगणवाड, पोउपनि राहुल लोखंडे, पो. शि. राहुल राठोड हे झोला गावात गस्त करुन रात्री अंदाजे ११:४५ वाजेच्या सुमारास गंगाखेडकडे परत येतांना पालम रस्त्यापासून झोला गावाकडे जाणाऱ्या रोडवर ५०० मिटर अंतरावर एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पीओ गाडी व एक मोटार सायकल रस्त्याच्या कडेला तर एक मोटार सायकल रस्त्यावर मध्यभागी आडवी लावलेली दिसल्याने गाडी थांबवुन खाली उतरून मोटार सायकल जवळ जाऊन पाहणी केली तेंव्हा रोडच्या खाली अंधारामध्ये झुडपाच्या आडोशाला दबा धरून बसलेले पाच इसम पोलीसांना पाहुन पळून गेले.

त्यांचा पाठलाग केला परंतु ते अंधाराचा फायदा घेवुन तेथुन फरार झाले असता स्कॉर्पीओ गाडीची पाहणी केली तेंव्हा स्कॉर्पिओ क्र. एम.एच २२ यु ३०३० यामध्ये पाठीमागच्या सिटच्याखाली पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये दोन तलवार व अर्धवर्तुळाकार असलेले धारदार फरशाचे चार हत्यार मिळून आल्याने याची माहिती पोनि. दिपककुमार वाघमारे यांना माहीती दिली असता गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपरसे, पोनि. दिपककुमार वाघमारे, सपोनि आदित्य लोणीकर, पोउपनि व्यंकट गंगलवाड आदी अधिकारी व अंमलदार तेथे आले. आजुबाजुच्या परीसरात फरार झालेल्या इसमांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही.

घटनास्थळावर सापडलेल्या दोन मोटार सायकल क्रमांक एमएच २२ एई ०२२३ व एमएच २२ एवाय २५१७, स्कॉर्पीओ गाडी क्र. एम.एच. २२ यु ३०३० या पोलीस ठाण्यात आणून पंचाचे समक्ष गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये अंदाजे ३६०० रुपये किंमतीच्या दोन तलवार व ४ गोलवर्तुळाकार फरशी (कुऱ्हाड) असे ६ धारधार शस्त्र, ८ लाख रुपये किंमतीची स्कार्पिओ, ४० हजार रुपये किंमतीची एक लाल काळ्या रंगाची हिरो कंपनीची फॅशन प्रो (उलटी नंबर प्लेट लावलेली) व ६० रुपये किंमतीची काळ्या पांढरे रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस असा एकुण ९,०३,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलीस उपनिरीक्षक राहुल गौतम लोखंडे यांच्या फिर्यादीवरून शस्त्रानिशी दरोडा घालण्याच्या पुर्व तयारीत असलेल्या अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाच्या पाच अनोळखी इसमाविरुद्ध विविध कलम अंतर्गत अक्टनुसार परभणीतील (Gangakhed Assembly Elections) गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याचा पुढील तपास सपोनि शिवाजी सिंगनवाड हे करीत आहेत. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पो. नि. दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड पोलीसांनी केली. (Gangakhed Assembly Elections) विधानसभा निवडणुक मतदानाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे मात्र गंगाखेड परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article