कुडाळ : कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 72.44 टक्के एवढे मतदान झाले. यात एकूण 279 बुथपैकी सर्वाधिक कमी मतदान सिंधुदुर्गनगरी बुथ क्रमांक 153 येथे 43.86 टक्के तर सर्वाधिक जास्त मतदान आमडोस बुथ क्रमांक 68 येथे 88.59 टक्के झाले आहे. दोन्ही तालुक्यात मिळून 33 बुथवर 80 टक्केपेक्षा जास्त मतदान झाले आहे. दरम्यान शनिवारी 14 टेबलांवर 20 फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
कुडाळ - मालवण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 2 लाख 17 हजार 186 मतदारांपैकी 81 हजार 584 पुरूष तर 75 हजार 739 महिला अशा एकूण 1 लाख 57 हजार 323 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरूष मतदारांचे 75.57 टक्के तर महिला मतदारांचे 69.34 टक्के एवढे मतदान झाले. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार वैभव विजय नाईक, महायुतीकडून शिंदे शिवसेनेचे नीलेश नारायण राणे, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अनंतराज नंदकिशोर पाटकर, बहुजन समाज पार्टीकडून रवींद्र हरिश्चंद्र कसालकर, अपक्ष उमेदवार उज्वला विजय येळाविकर या पाच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दरम्यान शनिवार 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.(Maharashtra assembly polls)
या मतदारसंघातील एकूण 279 मतदान केंद्रावर मतदान प्रकिया पार पडली. यात सर्वाधिक कमी मतदान कुडाळ तालुक्यातील सिंधुदुर्गनगरी केंद्र क्रमांक 153 येथे 43.86 टक्के व सिंधुदुर्गनगरी केंद्र क्रमांक 152 येथे 45.78 टक्के एवढे झाले. तर सर्वाधिक मतदान मालवण तालुक्यातील आमडोस केंद्र क्रमांक 68 येथे 88.59 टक्के, त्यापाठोपाठ कुडाळ तालुक्यातील केरवडे कर्याद नारूर केंद्र क्रमांक 188 येथे 88.39 टक्के एवढे झाले आहे. 80 टक्केपेक्षा जास्त मतदान दोन्ही तालुक्यात मिळून 33 केंद्रांवर झाले आहे. यात मालवण तालुका - बुधवळे केंद्र क्रमांक 3 येथे 83.30 टक्के, वडाचापाट केंद्र क्रमांक 39 येथे 83.90 टक्के, राणे शेमडावाडी केंद्र क्रमांक 58 येथे 80.60 टक्के, तोंडवली-तळाशील केंद्र क्रमांक 62 येथे 81.11 टक्के, ओझर केंद्र क्रमांक 63 येथे 80.87 टक्के, सर्जेकोट केंद्र क्रमांक 66 येथे 84.24 टक्के, आमडोस केंद्र क्रमांक 68 येथे 88.59 टक्के, चौके केंद्र क्रमांक 88 येथे 87.70 टक्के, घुमडे केंद्र क्रमांक 92 येथे 81.43 टक्के, मालवण एनपी केंद्र क्रमांक 105 येथे 82.75 टक्के, वायरी केंद्र क्रमांक 109 येथे 80.23 टक्के, वायरी केंद्र क्रमांक 111 येथे 81.52 टक्के, तारकर्ली केंद्र क्रमांक 113 येथे 80.96 टक्के, देवबाग केंद्र क्रमांक 116 येथे 81.04 टक्के, पडवे केंद्र क्रमांक 146 येथे 80.44 टक्के.
कुडाळ तालुका - गिरगाव केंद्र क्रमांक 159 येथे 80.89 टक्के, अणाव केंद्र क्रमांक 169 येथे 81.72 टक्के, बाव केंद्र क्रमांक 172 येथे 83.36 टक्के, नारूर कर्याद नारूर केंद्र क्रमांक 181 येथे 82.71 टक्के, केरवडे कर्याद नारूर 88.39 टक्के, निळेली केंद्र क्रमांक 189 येथे 80.55 टक्के, निवजे केंद्र क्रमांक 191 येथे 81.20 टक्के, पावशी केंद्र क्रमांक 195 येथे 80.15टक्के, पाट केंद्र क्रमांक 204 येथे 83.73 टक्के, आंबडपाल केंद्र क्रमांक 232 येथे 81.77 टक्के, तुळसुली तर्फ माणगाव केंद्र क्रमांक 235 येथे 82.66 टक्के, आंबेरी केंद्र क्रमांक 238 येथे 82.54 टक्के, मोरे केंद्र क्रमांक 242 येथे 85.86 टक्के, कांदुळी केंद्र क्रमांक 243 येथे 83.50 टक्के, कालेली केंद्र क्रमांक 244 येथे 82.41 टक्के, आंदुर्ले केंद्र क्रमांक 265 येथे 81.12 टक्के, पाट मुणगी केंद्र क्रमांक 267 येथे 82.91 टक्के, तेंडोली केंद्र क्रमांक 269 येथे 81.11 टक्के, वाडीवरवडे केंद्र क्रमांक 271 येथे 80.81 टक्के, झाराप केंद्र क्रमांक 276 येथे 83.45 टक्के असे मतदान झाले. तसेच 166 केंद्रांवर 70 टक्केपेक्षा जास्त तर 68 केंद्रांवर 60 टक्केपेक्षा जास्त मतदान झाले आहे.(Maharashtra assembly polls)
पोस्टल मतदानासाठी 1 हजार 734 टपाली मतपत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या. पैकी 1602 मतपत्रिका प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
स्ट्राँग रूमला कडेकोट पोलिस बंदोबस्त
कुडाळ तहसीलनजीक असलेल्या बॅडमिंटन हॉलमधील इमारतीत स्ट्राँग रूम तयार करून त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवत सर्व मशीन ठेवण्यात आल्या आहेत.त्याठिकाणी सीआरपीएफ, गोवा पोलिस आणि स्थानिक पोलिस अशा तीन पथकांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.