चारचाकी वाहनासह दोघे ताब्यात
परभणी (Gangakhed Crime) : येथील पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी आणि कोम्बींग ऑपरेशन दरम्यान परभणी शहरातील गंगाखेड रोडवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास कारवाई करत एका चारचाकी वाहनातून ४ लाख ९ हजार ५०० रुपयांची रोकड, ४ हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या. वाहनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून (Gangakhed Crime) कोतवाली पोलिस पुढची कारवाई करत आहेत.
पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने नाकाबंदी दरम्यान पो.नि. संजय नन्नवरे, पो.नि. विवेकानंद पाटील, पोउपनि. डि.व्ही. मुंढे, पोलिस अंमलदार रंगनाथ दुधाटे, रवि जाधव यांच्या पथकाने कारवाई केली. नाकाबंदीत पोलिसांनी संशयीत चारचाकी वाहन थांबविले. १९ नोव्हेंबरच्या पहाटे २.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ४ लाख ९ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच दारु मिळून आली. (Gangakhed Crime) पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले. संबधीतांना रोकड विषयी विचारणा केली असता त्यांनी अपेक्षीत उत्तर दिले नाही. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत कोतवाली पोलिस ठाण्यात आणला. रोकड विषयी जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. अधिक तपास सुरु आहे.