Google Map ने चुकीचा रस्ता दाखवल्याने तिघांचा मृत्यू, गुगल मॅप्स कुठून घेतो माहिती? जाणून घ्या

2 hours ago 1

Google Maps वापरत असाल तर सावधान. कारण, यामुळे तुम्हाला संकटाचा सामना करावा लागू शकतो. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये प्रवास करणाऱ्या कारचालकांसोबत असाच प्रकार घडला. जीपीएसमुळे कारचालकाला अपूर्ण पुलाचा रस्ता दिसला आणि कार पुलावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. Google Maps मुळे झालेला हा पहिला अपघात नाही. याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

या अपघातामुळे Google Maps वरच प्रश्न उपस्थित होत आहे. Google Maps मार्ग कसा दाखवतो, डेटा कुठून घेऊन मार्ग दाखवण्याचे काम करतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रश्नांचे उत्तरं जाणून घ्या.

Google Maps डेटा कुठून घेतो?

कुठेही जाण्यासाठी युजर Google Maps अ‍ॅपवर टॅप करून रस्ता विचारतो. आता एक्यूआयही पाहता येतो. गुगल आपल्या मॅप सर्व्हिससाठी अनेक प्रकारे डेटा गोळा करतो आणि त्याआधारे मार्ग सांगतो. सर्वप्रथम तो सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून मार्गाचे चित्र तयार करतो. ते तयार करण्यासाठी गुगल एरियल फोटोग्राफीचाही वापर करतो. गुगल ट्रॅफिक सिग्नल कॅमेरे, जीपीएस, युजर इनपुट आणि स्ट्रीट मॅपच्या माध्यमातून डेटा तयार करतो.

युजर्सना अलर्ट पाठवतो

Google Maps सर्व्हिस सर्व इनपुटसह रिअल टाईम डेटाचे विश्लेषण करते आणि त्याआधारे मार्ग दाखवते. Google Maps GPS प्रणालीद्वारे युजर्सचे स्थान आणि पोहोचण्याचे स्थान यांच्यातील मार्ग दाखवतो. वळणापूर्वी ते व्हॉईसच्या माध्यमातून युजर्सना अलर्ट पाठवतो. हे सर्व शक्य होते कारण गुगल अनेक प्रकारे डेटा गोळा करते.

रस्ता कसा आहे हे कळतं?

रस्त्याची अवस्था काय आहे, हे स्ट्रीट व्ह्यूच्या माध्यमातून कळते. ते कॅमेरे स्ट्रीट व्ह्यूसाठी जबाबदार आहेत जे गुगलला सद्यस्थितीची माहिती देतात. त्यांच्या माध्यमातून रस्त्यांची 360 अंशांची छायाचित्रे गुगलपर्यंत पोहोचली आहेत. या सर्वांवर प्रक्रिया केल्यानंतरच Google Maps च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवते.

रस्ता आधी समजून घ्या

Google Maps मदतीसाठी आहे, पण त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे योग्य नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोठ्या ठिकाणांसाठी Google Maps चांगलं काम करतं, पण नवीन रस्ता किंवा अरुंद रस्ता समजून घेताना कधी कधी तो मार्ग तितका अचूक सांगता येत नाही. अशा वेळी ते तुम्हाला अडचणीत आणते.

अरुंद रस्ता चुकू शकतो

गुगलला सॅटेलाईट इमेजेस आणि इतर माध्यमातून एखाद्या विशिष्ट ठिकाणी रस्ता असल्याची माहिती मिळते, पण नवीन रस्ते आणि जुन्या अरुंद रस्त्यांच्या सत्यतेच्या बाबतीत 100 टक्के विश्वास ठेवणे कठीण आहे.

लोकांना विचारा

तुम्ही आजूबाजूच्या व्यक्तीला विचारू शकता. मार्ग थोडा विचित्र वाटत असेल किंवा शांतता जास्त असेल तर सावध व्हा. अशा वेळी आंधळेपणाने पुढे जाण्यापेक्षा कोणाशी तरी बोलणे चांगले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article