Gram Panchayat Adhikari: ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द, आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मिळणार ओळख

1 hour ago 2

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; ग्रामसेवक युनियनच्या वतीने आनंदोत्सव साजरा

अमरावती (Gram Panchayat Adhikari) :  ग्रामपंचायतचा कारभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी या नावाने आजपर्यंत ओळख होती. मात्र दोन्ही पदे आता रद्द करण्यात आलेली असून यापुढे केवळ ग्रामपंचायत अधिकारी (Gram Panchayat Adhikari) या पदनामाने नवी ओळख या अधिकाऱ्यांना मिळाली असून सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामसेवक युनियनच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

ग्रामपंचायतला शासकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही पद एकच होते. मात्र लहान ग्रामपंचायतला काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामसेवक तर मोठी ग्रामपंचायत सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामविकास अधिकारी असे पदनाम असायचे परंतु दोन्ही पदे एकच असल्याने तसेच वेतन व भत्ते देखील सारखेच असल्याने ही पदे संभ्रम निर्माण करणारी आहेत. त्यामुळे एकाच नावाने ही ओळख कायम करावी, यासाठी (Gram Panchayat Adhikari) ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही दोन्ही पदे रद्द करून आता ग्रामपंचायत अधिकारी हे पदनाम कायम करण्यात आले. यापुढे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नवी ओळख मिळाल्याने ग्रामसेवक तसेच (Gram Panchayat Adhikari) ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

ग्रामसेवक युनियनचे राज्य संयुक्त सचिव तथा जिल्हाध्यक्ष कमलाकर वणवे साहेब व जिल्हा सरचिटणीस आशिष भागवत मानद अध्यक्ष श्री विलास बिरे ग्रामसेवक पतसंस्था अध्यक्ष राजकुमार चांदुरकर यांच्या नेतृत्वात फटाके फोडून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (Gram Panchayat Adhikari) यावेळी सहसचिव प्रशांत टिंगणे, मनीष इंगोले, पतसंस्था संचालक बबनराव कोल्हे,पतसंस्था खजिनदार वंदना गोपाळे संजय चौधरी विस्तार अधिकारी कृषी जयंत गंधे संजय गोफणे तसेच सर्व संचालक व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article