हिंगोली (Hingoli Assembly Elections) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज हिंगोलीत प्रचारसभेनिमित्त हेलीकॅप्टरने आले असता हेलीपॅडवर त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Hingoli Assembly Elections) रणधुमाळी सुरू आहे. त्या निमित्ताने अनेक पक्षांमार्फत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच प्रचाराच्या धामधुमीत विदर्भातील यवतमाळ येथे शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभे निमित्त आले असता निवडणूक विभागाच्या पथकाने त्यांच्या बॅगची तपासणी केली. या तपासणी नंतर त्याचे सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करण्यात आले.
तपासणीमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांची बॅग तपासणीकरीता आयोगाच्या पथकाला सहमती दर्शवून माझ्या प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांचेही बॅग तपासणी करून त्याचा व्हिडीओ मला पाठवावा, असे सूतवाच केले होते. या व्हिडीओवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याच दरम्यान १५ नोव्हेंबर रोजी आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष बांगर यांच्या निवडणूक प्रचारा निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे हिंगोलीत हेलीकॅप्टरने आले असता हेलीपॅडवर (Hingoli Assembly Elections) निवडणूक आयोगाच्या पथकाने हेलीकॅप्टरची पाहणी करून त्यामध्ये ठेवलेल्या वस्तूही त्यांनी पाहिले.