हिंगोली (Hingoli) :- नांदेड विभाग व्यवसाय सुलभ करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार कमी करण्यासाठी सर्वत्र डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहे. अधिक मार्गांनी कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामान्य बुकिंग आणि आरक्षण काउंटरवरही डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी, नांदेड विभागाने तिकीट खरेदीसाठी QR (Quick Response) कोडद्वारे तिकीट भाडे भरण्याची अतिरिक्त सुविधा सुरू केली आहे. यामुळे त्वरित तिकिटे खरेदी करण्याव्यतिरिक्त रोख पैसे घेऊन जाण्याची आणि टिकीटाची अचूक रक्कम देणे सुलभ होईल.
70 स्थानकांवर तिकीट काउंटरवर QR कोड सुविधा सक्षम
नांदेड विभागातील सर्व 70 स्थानकांच्या सर्व तिकीट काउंटरवर तिकीट खिडकीच्या बाहेर स्वतंत्र उपकरणे देण्यात आली आहेत. तिकिट जारी करण्यासाठीचे सर्व संबंधित तपशील सिस्टीममध्ये भरल्यानंतर, पेमेंट स्वीकारण्यापूर्वी, या उपकरणांवर QR कोड प्रदर्शित केला जातो आणि तो प्रवासी मोबाईल फोनमध्ये असलेल्या पेमेंट ॲप्सद्वारे स्कॅन करू शकतात. रक्कम मिळाल्याची खात्री झाल्यानंतर, तिकीट तयार केले जाईल आणि प्रवाशाला दिले जाईल. रेल्वे वापरकर्त्यांसाठी कॅशलेस व्यवहाराची ही सुविधा सुरुवातीला महत्त्वाच्या स्थानकांच्या प्रमुख काउंटरवर लागू करण्यात आली होती, ती आता विभागातील सर्व काउंटरवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
काही प्रमुख स्थानकांवर सुरू करण्यात आलेली सुविधा आता विभागातील सर्व 70 स्थानकांवर विस्तारित
श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग यांनी तिकीट काउंटरवर तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांच्या फायद्यासाठी आणखी एक डिजिटल पेमेंट पर्याय सादर केल्याबद्दल वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. त्यांनी सर्व रेल्वे वापरकर्त्यांना तिकिट खरेदीसाठी या संधीचा उपयोग करण्याचे आवाहन केले जे त्यांना टिकीटाची अचूक रक्कम देण्या करीता आणि चलन हाताळण्यात त्यांना खूप मदत होणार आहे.