Published on
:
03 Feb 2025, 1:13 pm
Updated on
:
03 Feb 2025, 1:13 pm
जळगाव : हैदराबाद-हिसार एक्सप्रेस मधून प्रवाशांच्या बॅगा चोरी करून दादर-अमृतसर एक्सप्रेस मध्ये बसत असताना महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या.पोलिसांनी या टोळीचा शोध घेऊन रेल्वेतून प्रवाशाची बॅग लंपास करून चोरी करणाऱ्या चार महिलांच्या टोळीला जळगाव रेल्वे पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारास अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार , या महिला प्रवाशांच्या बॅगा चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवास करत आहे. त्यांनी हैदराबाद-हिसार एक्सप्रेस मधून प्रवाशांची बॅग चोरी केली आणि नंतर दादर-अमृतसर एक्सप्रेस मध्ये बसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांची नोंद झाली. या घटनेनंतर पोलिसांनी या महिलांच्या टोळीचा शोध घेत त्यांना अटक केले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिस या टोळीच्या इतर गुन्ह्यांच्या शोधात आहेत.
या महिलांच्या टोळीविरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, रेल्वेतून चोरी केलेला २३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.