हिंगोली(Hingoli) :- हिंगोली शहरात एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार (torture) केला त्यानंतर तरुणी गरोदर राहिल्याने तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी २७ सप्टेंबरला एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गरोदर राहिल्याने तिला गोळ्या देऊन केला तिचा गर्भपात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरात एका तरुणीच्या घराचे बांधकाम (Construction) सुरू होते. या कामावर शहरातील आझम कॉलनी भागातील आहेद उर्फ आदू बेग मिर्झा (२६) हा कामासाठी येत होता. त्याने त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे आमिष दाखवून त्याने त्या तरुणीला पळवून नेले. त्यानंतर त्याने तरुणीला ता ३ जुलै ते २१ सप्टेंबर या दरम्यानच्या कालावधीत शहरातील आझम कॉलनी भागात व वसमत येथील जुम्मापेठ भागात त्याच्या घरी नेऊन तरुणीवर अत्याचार केला. सदर तरुणी गर्भवती (pregnant) राहिल्यानंतर तिने आहेद उर्फ आदू याच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र त्यांनी लग्न करण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर त्याने तरुणीला गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.
दरम्यान या प्रकाराची माहिती त्या तरुणीने तिच्या कुटुंबीयांना दिली. तिच्या कुटुंबीयांनी २७ सप्टेंबरला थेट हिंगोली शहर पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी आहेद उर्फ आदू बेग मिर्झा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपाधीक्षक मारुती थोरात, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, उपनिरीक्षक गंधकवाड, जमादार अशोक धामणे, संजय मार्के यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.