हिंगोली (Hingoli) :- सेनगाव पोलिस ठाणे हद्दितील एका २६ वर्षीय महिलेस तुझे कापड दुकान बंद पाडतो असे म्हणुन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मर्जी विरूध्द तिच्यावर अतिप्रसंग करून तिला मारहाण (beating) केल्याने सेनगाव पोलिसात एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मर्जी विरूध्द तिच्यावर अतिप्रसंग
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील बरडा पिंपरी येथील गजानन लक्ष्मण जोगदंड या २२ वर्षीय युवकाने एका २६ वर्षीय महिलेस “तु माझ्या सोबत प्रेम न केल्यास तुझे कापड दुकान बंद पाडतो” असे म्हणुन तिचा विनयभंग (molestation) केला. तसेच तिला लग्नाचे आमीष दाखवून जबरदस्तीने तिच्यावर अतिप्रसंग केल्यानंतर महिलेने त्याला लग्नाची मागणी केली असता तुझ्या सोबत लग्न करणार नाही असे म्हणुन तिला मारहाण केल्याने ५ फेब्रुवारीला सेनगाव पोलिस ठाण्यात गजानन जोगदंड याच्या विरूध्द गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि अशोक घारगे हे करीत आहेत.