भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये सुरू आहे.file photo
कांगारूंना 534 धावांचे टार्गेट; भारताला हव्यात फक्त 7 विकेटस्
किंग कोहलीचे शतकी कमबॅक त्याआधी यशस्वी जैस्वालचे दीडशतक आणि त्याने लोकेश राहुलसोबत केलेल्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने पर्थ कसोटी सामन्यात कांगारूंसमोर 534 धावांचे टार्गेट सेट केले. विराट कोहलीचे शतक पूर्ण होताच भारतीय संघाचा कार्यवाहू कर्णधार जसप्रीत बुमराह याने भारतीय संघाचा दुसरा डाव 6 बाद 487 धावांवर घोषित केला. पहिल्या डावातील 46 धावांच्या आघाडीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघासमोर मोठे टार्गेट सेट केले आणि दिवस संपताना ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज तंबूतही पाठवले. त्यामुळे उरलेल्या दोन दिवसांत भारताला विजयासाठी यजमान संघाच्या 7 विकेटस् घ्यायच्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाला 522 धावा करायच्या आहेत.