Published on
:
25 Nov 2024, 4:09 am
Updated on
:
25 Nov 2024, 4:09 am
नाशिक : देवळाली मतदासंघात एकूण 12 उमेदवारांपैकी 7 उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पहिल्या फेरीत नोटापेक्षा 6 उमेदवारांना कमी मते होती. हाच ट्रेन्ड शेवटपर्यंत कायम राहिला. शेवटची फेरी येईपर्यंत 7 उमेदवार हे नोटोपेक्षाही पिछाडीवर गेल्याने देवळालीकरांसाठी हा चर्चेचा विषय ठरला.
भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीत एकही उमेदवार पसंत नसल्यास 'यापैकी कुणाही नाही' अर्थात 'नन ऑफ दि अबाऊ' हा पर्याय मतदारांसाठी खुला ठेवला आहे. याचा वापर करून मतदार उमेदवार पसंत नसल्यास नोटाचे बटन दाबू शकतात. याच पर्यायाचा वापर करून सुमारे 1406 मतदारांनी देवळालीत नोटाचे बटन दाबत एकही उमेदवार पसंत नसल्याचे दाखवून दिले. परिणामी, देवळालीत सुमारे 7 उमेदवारांपेक्षाही नोटाला जास्त मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
विसाव्या फेरीअखेर देवळालीत नोटाला 1406 मते मिळाली. त्याखालोखाल महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचे विनोद संपतराव गवळी यांना 1269 मते मिळाली. बहुजन समाज पार्टीचे योगेश (बापू) बबनराव घोलप यांना 758 मते, तर त्याखालोखाल अपक्ष उमेदवार भारती राम वाघ आणि लक्ष्मी रवींद्र ताठे यांना एकसारखी 751 मते पडली. यानंतर रविकिरण चंद्रकांत घोलपांना 744, तर कृष्णा मधुकर पगारे यांना 250 मते मिळाली. अमोल संपतराव पगारे यांना 222 मते पडली. यामुळे नोटाच्या खालोखाल 7 उमेदवार राहिल्याने देवळालीत आश्चर्य व्यक्त होत आहे.