राज्यातील शनिवारचे तापमान: अहिल्यानगर 11.7,गोंदिया 12.7, नागपूर 13, नाशिक 13,जळगाव 13.1,पुणे 13.4,महाबळेश्वर 13.9, मालेगाव 13.8, कोल्हापूर 17.1, , सांगली 15.8, सातारा 14.5,सोलापूर 17.2,धाराशिव 14.6, छ.संभाजीनगर 14, परभणी 13.5, अकोला 15.3,अमरावती 15.6, बुलढाणा 15, ब्रम्हपुरी 13.1,चंद्रपूर 15.4,वर्धा 13.4.मुंबई 22.7
डिसेंबरमधील चारही आठवडे या नकाशात दाखविले आहेत. 1 ते 7 डिसेंबरदरम्यान राज्यात ढगाळ वातावरणाची सुरुवात होत आहे. दुसर्या आठवड्यात राज्य ढगांनी वेढलेले दिसत आहे. तिसर्या आणि चौथ्या आठवड्यात मात्र पुन्हा आभाळ निरभ्र होऊन थंडी.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे वेगाने येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, प श्चमबंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांत 12 डिसेंबरपर्यंत किमान तापमानात वाढ होईल. कारण, या राज्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, असे सॅटेलाइट इमेजवरून दिसते आहे.
- डॉ.अनुपम कश्यपी, हवामानशास्त्रज्ञ (निवृत्त, आयएमडी पुणे)