India vs England 1st ODI :- रोहित शर्माच्या (Rohit Sharma)नेतृत्वाखालील भारतीय संघ ६ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली. आता टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया एकदिवसीय मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित करेल. अशा परिस्थितीत, भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका कधी, कुठे आणि कशी खेळवली जाईल हे तुम्हाला माहिती आहे का ? याबद्दल जाणून घ्या अधिक माहिती.
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक आणि वेळ
१ . ६ फेब्रुवारी – भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना – दुपारी १:३० वाजता, व्हीसीए, नागपूर
२ . ९ फेब्रुवारी – भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना – दुपारी १:३० वाजता, बाराबाटी स्टेडियम, कटक
३ . १२ फेब्रुवारी – भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना – दुपारी १:३० वाजता, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना ६ फेब्रुवारी रोजी नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळला जाईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर दुपारी १:३० वाजता भारतीय वेळेनुसार खेळला जाईल. याच्या अर्धा तास आधी टॉस कॉईन टाकले जाईल. भारत आणि इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेतील सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (Star sports Network)थेट प्रक्षेपित केले जातील, तर डिस्ने प्लस हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपित केले जातील.
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्यांची आकडेवारी:
भारत आणि इंग्लंडमध्ये एकदिवसीय स्वरूपात एकूण १०७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने ५८ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने ४४ सामने जिंकले आहेत. दोन सामने बरोबरीत सुटले आणि तीन सामने निकालाविना राहिले.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, हर्षित राणा.
इंग्लंड संघ
जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.