IPL 2025 Expensive Players : टॉप 10 महागडे खेळाडू, ऋषभ पंत सर्वात श्रीमंत, इतर 9 खेळाडूही मालमाल

1 hour ago 1

IPL 2025 Auction Expensive Players: आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडू मालामाल झाले. मात्र 10 खेळाडूंवर सर्वाधिक पैसा खर्च करण्यात आला. पाहा सर्वात महागडे टॉप 10 खेळाडू कोण?

 टॉप 10 महागडे खेळाडू, ऋषभ पंत सर्वात श्रीमंत, इतर 9 खेळाडूही मालमाल

rishabh sound astir costly subordinate successful ipl historyImage Credit source: AFP

| Updated on: Nov 26, 2024 | 9:19 AM

आयपीएल 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) जेद्दाहमध्ये 2 दिवसीय मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शमध्ये 10 फ्रँचायजीत खेळाडूंना घेण्यासाठी चुरस, चढाओढ आणि जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. एकूण 10 संघांनी 182 खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं. या 182 खेळाडूंवर 639.15 कोटी रुपये खर्च करण्यात आले. अनेक खेळाडूंवर विक्रमी बोली लागली. अनेक खेळाडूंना कोटींची किंमत मिळाली. मात्र त्यातही सर्वाधिक रक्कम घेणारेही खेळाडू आहेत. आपण या मेगा ऑक्शनमध्ये 10 सर्वात श्रीमंत खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.

स्फोटक विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत हा सर्वात महागडा ठरला. तर श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर या आडनाव बंधूंची रग्गड कमाई झाली. तसेच इतर 7 खेळाडूंवरही फ्रँचायजींनी पैशांचा पाऊस पाडला. एकूण 20 खेळाडूंवर 10 कोटींपेक्षा अधिक बोली लागली. त्यापैकी 10 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.

  1. ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंतवर 27 कोटींची विक्रमी बोली लागली. दिल्लीचा माजी कर्णधार हा आता लखनउ सुपर जायंट्सचा खेळाडू झाला आहे.
  2. श्रेयस अय्यर याने आपल्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला 2024 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. त्यानंतरही श्रेयसला रिलीज केलं. हा आयपीएल विजेता कर्णधार दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. श्रेयससाठी पंजाब किंग्सने 26 कोटी 75 लाक रुपये मोजले.
  3. केकेआरच्या आयपीएल 2024 फायनलचा हिरो ठरलेला वेंकटेश अय्यर याच्यावरही पैशांचा पाऊस पाडला. वेंकटेश तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. वेंकटेशसाठी केकेआरने पूर्ण जोर लावून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. वेंकटेशची यासह पुन्हा घरवापसी झाली.
  4. टी 20 वर्ल्ड कप 2024 विजेता गोलंदाज अर्शदीप सिंह चौथा महागडा खेळाडू ठरला.अर्शदीपला पंजाबने रिटेन केलं नाही, मात्र ऑक्शनमधून आपल्या ताफ्यात घेतलं. अर्शदीपसाठी पंजाबने आरटीएमचा वापर करत 18 कोटी मोजले.
  5. युझवेंद्र चहल याच्यावरही मोठी बोली लागली. पंजाबने चहलला 18 कोटींमध्ये घेतलं. चहल यासह सर्वात महागड स्पिनर ठरला.
  6. इंग्लंडचा टी 20 कर्णधार जॉस बटलर याला गुजरात टायटन्सने आपल्या गोटात घेतलं. गुजरातने जॉससाठी 15.75 कोटींची बोली लावली. जॉस यासह सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला.
  7. लखनऊने करारमुक्त केल्यानंतर केएल राहुलला नवा संघ मिळाला. मात्र केएलला काही प्रमाणात कमी रक्कम मिळाली. दिल्लीने केएलसाटी 14 कोटी मोजले.
  8. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आणि पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट्स घेण्यात माहिर असलेला ट्रेन्ट बोल्ट याची घरवापसी झाली आहे. ट्रेन्टला मुंबईने 12.50 कोटी मोजून आपल्या गोटात घेतलं आहे.
  9. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याची 3 वर्षांनंतर राजस्थानमध्ये घरवापसी झाली आहे. राजस्थानने जोफ्रासाठी 12 कोटी 50 लाख रुपये मोजले.
  10. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज 1 वर्षांच्या विश्रांतीनंतर पु्न्हा बंगळुरु टीममध्ये आला आहे. आरसीबीने जोशसाठी 12 कोटी 50 लाख रुपये मोजले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article