Published on
:
18 Jan 2025, 9:39 am
Updated on
:
18 Jan 2025, 9:39 am
नाशिक : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक व युवतींना इस्रायल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इस्रायल येथील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहायक क्षेत्रात युवक- युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.
इस्रायलमध्ये रोजगार व नोकरासाठी इंग्रजी भाषेचे तसेच सामान्य ज्ञान असणारे 25 ते 45 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र आहेत. उमदेवाराने भारतातील नियमाक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेला व किमान 990 तासांचे अभ्यासक्रम पूर्ण केलेला असून, प्रमाणपत्र (ऑन जॉब ट्रेनिंगसह) असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरीमधील प्रशिक्षण, संबंधीत भारतीय अधिकार्यांच्या देखरेखीखली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट याबाबचे प्रशिक्षण पूर्ण असलेले, जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएस्सी नर्सिंग, पोस्ट बीएस्सी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवारही या रोजगारासाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक या कार्यालयात प्रत्यक्ष अथवा कार्यालयाचा 0253-2993321 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सव्वा लाखापर्यंत मासिक वेतन
इस्रायलमध्ये नोकरी मिळण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना 1 लाख 31 हजारांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.