कळमनुरी (Kalmanuri Assembly Elections) : कळमनुरी विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के (Dr. Dilip Muske) यांच्या वाहनावर सोमवारी रात्रीच्या सुमारास सेलसुरा पाटीवर दगडफेकीची घटना घडली. ज्यामध्ये डॉ.मस्के यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड रूग्णालयात हलविले. घटनेबाबत कळमनुरी पोलिसात पाच अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल झाला.
मिळालेली माहिती अशी की, (Kalmanuri Assembly Elections) कळमनुरी विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के (Dr. Dilip Muske) हे १८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास हिंगोली ते कळमनुरी मार्गावरून जात असताना सदर ठिकाणी स्वीफ्ट डिझायर वाहनातून आलेल्या पाच व्यक्तींनी डॉ.मस्के यांच्या कारसमोर वाहन अचानक आडवे लावले. या वाहनातील तोंडाला रूमाल बांधलेल्या पाच आरोपीतांनी डॉ.मस्के यांची कार क्रमांक एम.एच.१२-क्यू.वाय. ८०८२ वर दगडफेक करून कारच्या काचा फोडून नुकसान केले.
या दगडफेकीत डॉ. दिलीप मस्के (Dr. Dilip Muske) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, जमादार कैलास सातव, गजानन होळकर, प्रशांत शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. (Kalmanuri Assembly Elections) याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्तेही घटनास्थळी एकत्र आले होते. दगडफेकीत जखमी झालेले डॉ. मस्के (Dr. Dilip Muske) यांना तात्काळ हिंगोली येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले.
त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरीता नांदेड रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेबाबत अफताब रहीम खाँ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे हे करीत आहेत.