कळमनुरी (Kalmanuri police) : कळमनुरी ते हिंगोली रस्त्यावरून एका स्वीफ्ट डिझायर कारमधून अवैध दारू नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने शनिवारी रात्रीच्या सुमारास सापळा रचून दहा बॉक्स देशी दारूसह कार असा एकूण ५ लाख ३३ हजार ६०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये एका आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला.
सध्या विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. त्या निमित्ताने अवैध दारू, पैसा हा वाहनातून नेण्यात येत असल्याने (Kalmanuri police) जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकार्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
१६ नोव्हेंबर रोजी कळमनुरी पोलिसांचे पथक रात्रीच्या गस्तीवर असताना एका स्वीफ्ट डिझायर वाहनातून दारूचे बॉक्स नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून कळमनुरी-हिंगोली रस्त्यावर रात्री १० च्या सुमारास शिवार ढाब्याच्या बाजूला पोलीस सदर कारच्या मागावर होती. याचवेळी स्वीफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच.१४-जी.डी.०३०७ ही दिसून येताच कार चालकाने (Kalmanuri police) पोलिसांना गणवेशात पाहून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी ही कार पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची तपासणी केली असता कारमध्ये १० देशी दारू बॉक्समधील ४८० बाटल्या दिसून आल्या.
ज्यामध्ये पोलिसांनी ५ लाख रूपयाची कार व ३३ हजार ६०० रूपयाची १० बॉक्समधील अवैध दारू असा एकूण ५ लाख ३३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात कळमनुरी पोलिसात (Kalmanuri police) गजानन सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास टाले रा.कळमनुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास भडके हे करीत आहेत. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी भुसारे, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, पोले, सोपान सांगळे, सातव, बलखंडे यांच्यास अन्य पोलीस कर्मचार्यांनी केली आहे.