लातूर (Latur):- श्री उत्तरादी मठाचे जगद्गुरु श्रीमध्वाचार्य मूल महासंस्थान श्री श्री 1008 श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराज यांचे लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी नियोजित धार्मिक कार्यक्रमांचे (Religious events) आयोजन करण्यात आले असून त्यासाठी लातूर येथील श्री उत्तरादी मठात शुक्रवारी (दि.10) सायंकाळी 6 वाजता त्यांचे आगमन होत आहे.
श्री श्री 1008 श्री सत्यात्मतिर्थ स्वामी यांचे जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रम
लातूर येथे उत्तरादीमठ व श्री मध्व मंडळ व भक्तांकडून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर उत्तरादी मठात रघृत्तम स्तोत्र एककोटी पारायण जपयज्ञाचे संकल्प तसेच विद्वान यांचे प्रवचन होईल. यावेळी जगद्गुरू श्री श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराज यांचे प्रवचन होईल अशी माहिती श्री उत्तरादिमठाचे लातूरचे प्रतिनिधी रघुत्तंमाचार्य जोशी यांनी दिली. 11 फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता ते सकाळीं ८ वाजेपर्यंत हनुमंतवाडी मळवटी तालुका लातूर येथे आयोजित श्री पट्टाभिराम मूर्ती प्रतिष्ठापना जगद्गुरु श्री च्या श्री १००८ श्री सत्यातमतिर्थ स्वामीजी यांहस्ते होणार आहे. सकाळी साडेआठ ते आकरा वाजता तप्त मुद्रा धारणा, त्यानंतर ११.३० वाजता संस्थान महापूजा श्री कृष्णाचार्य शिवणे यांच्या निवासस्थानी राधिका विहार गायत्री उत्सव समोर लातूर येथे होईल. त्यानंतर महाप्रसाद होईल सायंकाळी ६ वाजता श्री उत्तरादिमठ येथे जगद्गुरू स्वामी महाराज यांचे प्रवचन महामंगळार्ती व मंत्रआक्षता होईल.
श्री पट्टाभिराम मूर्ती प्रतिष्ठापना जगद्गुरु श्री च्या श्री १००८ श्री सत्यातमतिर्थ स्वामीजी यांहस्ते होणार
१२ फेब्रुवारी सकाळी 7.30 वाजता उत्तरादीमठात श्री नरसिंहाला स्वामी महाराज यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक होईल मंत्राक्षता मुद्राधारन होईल. संस्थान महापूजा पद्युमनाचार्य शिवणे यांच्या निवासस्थानी रवींद्रनाथ टागोर नगर लातूर येथे होईल. १२ फेब्रुवारी रोजी जगद्गुरू श्री श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराज यांचे सायंकाळी पाच वाजता निलंगा तालुक्यातील हलगरा येथे उतरादी मठात प्रवचन होईल. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी मुद्रा धारणा दुपारी संस्थान महापूजा हलगरा येथे पांडुरंग दिगंबर वकील यांचेकडे होईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमात भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री उत्तरादी मठाचे लातूरचे प्रतिनिधी रघुतमाचार्य जोशी श्री मध्व मंडळाचे अध्यक्ष अँड. श्रीराम (बळवंत) देशपांडे सचिव श्री उत्तरादी मठ व मध्व मंडळाचे प्रसिध्दी प्रमुख हरिराम कुलकर्णी व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.