आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांना सवाल केला असता, त्यांनी यावर भाष्य केले आहे. ‘सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नाही, असा शब्द दिला होता. त्यामुळेच आज मराठा शांत आहेत.’, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ‘जामीन मिळू दे नाहीतर नाही… पण ३०२ चा उलगडा झालाच पाहिजे. हे मोठं षडयंत्र आहे. पण तपास यंत्रणा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकच आशा आहे की, याप्रकऱणातील एकही आरोपी ते सुटू देणार नाहीत. त्या सर्व आरोपींना जेलवारी करायला लावणार’, असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी आपली अपेक्षा व्यक्त केली. पुढे ते असेही म्हणाले, वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी द्यायला नको होती. कारण या प्रकरणाता अजून मोठा तपास बाकी आहे. वाल्मिक कराडने खून केला? वाल्मिक कराडनेच खून करायला लावला आहे. खंडणी आणि खूनाचे आरोपी एकच आहेत. त्यामुळे कराडला न्यायालयीन कोठडी द्यायला नको पाहिजे होती, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Published on: Jan 22, 2025 12:28 PM