कॉपमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याची तयारी:संवेदनशील केंद्राची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करा; विभागीय आयुक्तांचे आदेश

3 hours ago 2
मराठवाड्यात इयत्ता बारावी व दहावी परीक्षा कॉपमुक्त वातावरणात पार पाडल्या जाणार असून त्यासाठी संवेदनशील व अतिसंवेदनशील परीक्षा केंद्राची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी या केंद्रावर बैठे पथक स्थापन करण्याच्या सुचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. मराठवाड्यात इयत्ता बारावी व दहावीच्या परीक्षांना लवकरच सुरवात होणार आहे. या परीक्षा कॉपमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासनाकडून आवश्‍यक कार्यवाही केली जात आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त गावडे यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालयांना आवश्‍यक सुचना दिल्या आहेत. या परीक्षांसाठी संवेदनशील व अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रावर बैठे पथक नियुक्त करून हे पथक परीक्षा सुरु होण्यापुर्वी एक तास आगोदर व परीक्षा संपल्यानंतर परिरक्षण केंद्रावर पाठविण्यापर्यंत थांबविण्याच्या सुचना दिल्या आहेत. या केंद्रावर वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करावा. तसेच परीक्षा केंद्रावर प्रश्‍नपत्रिकांची पाकिटे नेतांना वाहतुकीचे छायाचित्रीकरण करावे या सोबतच परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत छायाचित्रीकरणामध्ये प्रश्‍नपपित्रकांची पाकिटे फोडावीत. ज्या विषयाची परीक्षा असेल त्या दिवशी त्या विषयाच्या शिक्षकांची केंद्रावर नियुक्ती करू नये अशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत. या शिवाय जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना सरप्राईज व्हिजीट देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक भरारी पथक नियु्क्त करावे. या शिवाय आवश्‍यकता वाटल्यास एका पेक्षा अधिक भरारी पथक नियुक्त करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. परिक्षेच्या कालावाधीत गैरप्रकाराचा अवलंब केल्यास मंडळाकडून होणाऱ्या कारवाईची पुर्वकल्पना विद्यार्थी, पालकांना संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी द्यावी अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. १४०८ महाविद्यालयांतर्गत ४६० परीक्षा केंद्र मराठवाड्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा ता. ११ फेब्रुवारी ते ता. १८ मार्च या कालावधी घेतली जाणार आहे. तर इयत्ता दहावी परीक्षा ता. २१ फेब्रुवारी ते ता. १७ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. मराठवाडयात छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना, हिंगोली जिल्हयात १४०८ महाविद्यालयांतर्गत ४६० परीक्षा केंद्र असून १.८५ लाख विद्यार्थी परीक्षा देतील. तर इयत्ता दहावीच्या २७३७ शाळांमधून ६४४ परीक्षा केंद्रावर १.८८ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article