'तुम्हाला अजून किती बळी हवे आहेत? माणसं मेलीत माणसं… सरकारने भावना शून्य होऊ नये. आरक्षणाबाबतचा लवकर निर्णय घ्या.', मराठा तरुणाने आत्महत्या केल्याने मनोज जरांगे पाटील सरकारवर चांगलेच आक्रमक...
मराठा तरूणाने आपलं आयुष्य संपवल्यानंतर मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारने भावना शून्य होऊ नये. आरक्षणाबाबतचा लवकर निर्णय घ्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. राज्यातील मराठा बांधवांना हातजोडून विनंती आहे. मी समाजासाठी प्रयत्न करत आहे. आरक्षण मिळवणारच आहे. जिव्हारी लागेल असं पाऊल उचलू नका. काल बीडमध्ये आत्महत्या झाली. सिल्लोडमध्ये आत्महत्या झाली. माझी हात जोडून विनंती आहे, आत्महत्या करू नका. नंबर गेला तर गेला, अजून शिकू. आरक्षण मिळाल्यावर पुन्हा शिका. पण कायमचं आयुष्य संपवू नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या मुलांना केलं. पुढे मनोज जरांगे असेही म्हणाले, मला सरकारला विचारायचंय की तुम्हाला किती बळी हवी आहेत? तुम्हाला काहीच वाटत नाही का? अरे माणसं मेलीत माणसं. तुम्ही माणुसकी शुन्य झालात.. आमचा सयंम सुटला तर आम्हाला राज्यात वेगळं आंदोलन करावं लागेल. जातीच्या मुलांपेक्षा आम्हाला काहीच मोठं नाही. तुम्हाला जशी मुलं आहेत, तशी मराठ्यांनाही मुलं आहेत. तुम्ही त्यांनाही तुमची लेकरं समजा. आमचा विनाकारण संयम ढळला तर नाईलाजाने वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
Published on: Feb 03, 2025 01:37 PM