इंग्लंडविरुद्धचा पाचवा टी20 सामना डावखुऱ्या अभिषेक शर्माने गाजवला. अभिषेक शर्माने येईल त्या गोलंदाजाला फोडला. अभिषेक शर्माचं रौद्र रूप पाहून इंग्लंडच्या गोलंदाजांनाही घाम फुटला होता. अभिषेक शर्माच्या आक्रमक खेळीमुळे भारताने पॉवर प्लेमध्ये 95 धावांची विक्रमी खेळी केली. इतकंच काय तर अभिषेक शर्माने या सामन्यात 54 चेंडूंचा सामना करत 13 षटकारांच्या मदतीने 135 धावा केल्या. तसेच 18 व्या षटकापर्यंत मैदानात तग धरून टीम इंडियाला 247 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. या खेळीसह अभिषेक शर्माने आपला गुरु असलेल्या युवराज सिंगचं स्वप्न पूर्ण केलं. अभिषेक शर्माने सामन्यानंतर याबाबतचा खुलासा केला. युवराज सिंग यांची इच्छा होती की, मी 15 ते 20 षटकांदरम्यान फलंदाजी करावी. आज ते पाहून त्याला आनंद झाला असेल. अभिषेक शर्माने या सामन्यात पूर्णपणे आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं होतं. तसेच शेवटपर्यंत मैदानात तग धरून राहिल्यास काय करू शकतो हे दाखवून दिलं. गुरू युवराज सिंगने सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. यामुळेच यश हाती लागलं.
दरम्यान, अभिषेक शर्माची फलंदाजी पाहून गुरु युवराज सिंगही व्यक्त झाला आहे. युवराज सिंगने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘अभिषेक तू खरंच खूप छान खेळला. मी तुला तिथेच पाहू इच्छितो. मला तुझा अभिमान वाटतो.’ युवराज सिंगची प्रतिक्रिया आल्यानंतर अभिषेक शर्माही व्यक्त झाला आहे. अभिषेक शर्माने सांगितलं की, ‘पहिल्यांदाच चप्पलेची धमकी न देता कौतुक केलं आहे. त्यांना माझा अभिमान वाटतो. या गोष्टीने मी खूश आहे.’
Well played @IamAbhiSharma4! That’s wherever I privation to spot you! 🔥 Proud of you 👊🏻💯#IndVSEng
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) February 2, 2025
‘तीन वर्षांपासून मी त्याच्यासोबत ट्रेनिंग करत हे. तेव्हापासून त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि सांगितलं की, एक खेळाडू म्हणून शंका आहे पण तू भारताला एक दिवस सामना जिंकून देशील. कोविड काळात त्यांनी सांगितलं होतं की शॉर्ट टर्मबाबत विचार करू नको. मी तुला पुढच्या काही काळासाठी तयार करत आहे.’, असंही अभिषेक शर्माने पुढे सांगितलं.