अनेक निराधारांची खाती आधारकार्ड व मोबाईलला संलग्न नसल्याने व्यत्यय…
मानोरा (Manora) : विधानसभा निवडणूकांपासून (Assembly Elections), अनेक निराधार, वयोवृद्ध, दिव्यांग आणि महिला लाभार्थ्याला महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) संजय गांधी योजना विभागाचे निराधारांना मिळणारे 1500 रुपये अनुदान न मिळाल्याने त्यांची उपासमार होत आहे. निराधारांच्या रक्कमेसाठी, संबंधीत बँका आणि तहसिल कार्यालयात पायपीट सुरु आहे.
शासनाकडून मंत्रालयामार्फत त्यांच्या खात्यात थेट रक्कम वळती!
आधी अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयामार्फत दिली जात होती. परंतु आता शासनाने पूर्वीचे नियम बदलवून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरण योजनने म्हणजेच डि. बी. टी. ने मंत्रालयातून (Ministry) पाठवली जात आहे. त्यासाठी आता संबधित तहसिल कार्यालयामार्फत (Tehsil Office) दरमहा शासनाला लाभार्थींची संपूर्ण यादी पाठवीली जाते. त्या यादीप्रमाणे मंत्रालयामधून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट (DBT) अनुदान प्रणालीने अनुदानाची रक्कम पाठवील्या जात आहे. म्हणून प्रत्येक लाभार्थ्याचे खात्याला आधार कार्ड व मोबाईल संलग्न असणे अत्यावश्यक आहे, तरी प्रत्येक निराधारांनी जवळच्या आधार केन्द्रावरून आपले आधार कार्डला बॅकेचे खाते व मोबाईल क्रमांक अपडेट करून घेतला पाहीजे. अद्यापपावेतो बऱ्याच लाभार्थ्यानी आधारकार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करून न आणल्यामुळे शासनाकडून मंत्रालयामार्फत (Ministry of Govt) त्यांच्या खात्यात थेट रक्कम वळती करण्याला अडचण येत असल्याचे कारण देखील पुढे आले आहे.