MLA Crime Case: मिठाईचे डब्बे वाटून प्रलोभन दिल्याने आमदार पुत्रावर अदखलपात्र गुन्हा दाखल

2 days ago 1

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मागविला होता खुलासा

हिंगोली (MLA Crime Case) : शहरात दिवाळी दरम्यान व्यापार्‍यांना मिठाईचे डब्बे वाटून प्रलोभन दिल्याने हिंगोली शहर पोलिसात आ. तान्हाजी मुटकुळे यांचे पुत्र शिवाजी मुटकुळे यांच्यावर कारवाई अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंगोली शहरातील गांधी चौक, सराफा गल्ली, जवाहर रोड व शहरातील इतर दुकानांवर ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत लाल पांढर्‍या व पिवळ्या रंगाच्या मिठाईचे डब्बे वाटप करण्यात आले होते. या संदर्भात हिंगोली निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी पत्राद्वारे खुलासाही मागविला होता. सदर प्रकरणात एफएसटी पथक प्रमुख जालंदर घुगे यांनी १८ नोव्हेंबरला तक्रार दिली. व्यापार्‍यांना मिठाईचे डब्बे वाटून प्रलोभन दिल्याने शिवाजी तान्हाजी मुटकुळे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article