बांगलादेशींची नोंदणी बाबत याचे केंद्र मालेगाव असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
:
01 Feb 2025, 4:01 am
Updated on
:
01 Feb 2025, 4:01 am
नाशिक : जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांत दोन लाख 14 हजार बांगलादेशींची नोंदणी झाली असून, प्रमाणपत्र मिळविण्याकामी 389 कोटी खर्च करण्यात आले आहेत. राज्यातील 54 शहरांत यासाठी एकच कार्यपद्धती वापरण्यात आली आहे. याचे केंद्र मालेगाव असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मालेगावमधील बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी खोटी कागदपत्रे देऊन जन्मदाखले घेतल्याप्रकरणी शुक्रवारी (दि. 31) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे माजी खा. किरीट सोमय्यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेत पुरावे सादर केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सोमय्या म्हणाले की, मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना स्थायिक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून, याबाबत विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रात मालेगाव, शिरपूर यांना केंद्र करून व्होट जिहाद करण्यात आला आहे. बांगलादेशींनी खोटी कागदपत्रे देऊन फसवणूक करून मालेगावमध्ये जन्म झाला असे प्रमाणपत्र घेतले याचे सबळ पुरावे विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. तहसीलदाराने ऑर्डरमध्ये शाळा सोडल्याचा दाखला दिला असे लिहिले आहे. मात्र, अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला जोडलेला नाही यावरून तहसीलदार कार्यालयातील कर्मचार्यांच्या संगनमताने हे षडयंत्र रचण्यात आले आहे, हे पुराव्यांवरून सिद्ध होते. हा घोटाळा विधानसभा निवडणुकीदरम्यान झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा
54 शहरांत एक हजारहून अधिक बांगलादेशी, रोहिंग्यांनी 65 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील त्या गावात जन्म झाला असे अॅफिडेव्हिट देऊन जन्म प्रमाणपत्र मिळविले. तीन हजार 977 लोकांना 2024 मध्ये तहसीलदारांनी प्रमाणपत्र दिले, मात्र रजिस्टरमध्ये केवळ 1,106 प्रमाणपत्रांची नोंदणी आहे. तहसीलदारावर केवळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्यास अटक नाही. हे देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचे पाप आहे. हा देशद्रोहाचा गुन्हा आहे असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे, राहुल गांधींचे समर्थन आहे का?
मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश वगळता मराठवाडा आणि विदर्भात एकाच प्रकारची कार्यपद्धती वापरण्यात येत आहे. याच्यामागे सिंडिकेट गँग असून तिला पकडायचे आहे. ही गँग बांगलादेशी, रोहिंग्यांना देशात घुसवू बघत आहे. देशाच्या सुरक्षेशी खेळणार्या आमदार, खासदार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांचे त्यांना समर्थन आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला
मालेगावमध्ये जे रेशनकार्ड देण्यात आले आहे, त्यात 80 टक्के बोगस रेशनकार्ड आहेत. 5 रेशनकार्डमधील नावे वाचून दाखवावीत, ती वाचता येत नाहीत असे असताना तहसीलदारांनी रेशनकार्ड मंजूर केलेच कसे? विधानसभा निवडणुकीत व्होट जिहाद फंडिंग घोटाळा काढला होता, त्यावर ईडीची चार्जशीट दाखल झाली आहे. 2,200 कोटींचा घोटाळा समोर आला असून, त्यात 7 लोक जेलमध्ये आहेत असेही ते म्हणाले.