आहेर महाविद्यालयाच्या पदवी परीक्षांच्या मूल्यमापन प्रकल्पास भेट देण्यासाठी आलेले विद्यापीठ संचालकांची समिती ( छाया -सोमनाथ जगताप )
Published on
:
22 Jan 2025, 11:09 am
Updated on
:
22 Jan 2025, 11:09 am
देवळा | येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात सुरू असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.ए. आणि बी.कॉम.या पदवी परीक्षांच्या केंद्रीय मूल्यमापन प्रकल्पास विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, नाशिक विभागीय उपकेंद्राचे सहाय्यक कुलसचिव श्रीपाद बुरकुले, केंद्रीय मूल्यमापन प्रकल्पांचे जिल्हा समन्वयक व विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे माजी संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी भेट दिली.
या समितीने विद्यालयाच्या मूल्यमापन प्रकल्पाच्या कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प हा विद्यापीठांच्या सर्व परीक्षांचे निकाल विहित वेळेत घोषित करण्यासाठी राबवला जाणारा प्रकल्प आहे. प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे कामकाज वेळेत पूर्ण होत असल्याचा आनंदही डॉ. काकडे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत- सत्कार प्रा जयवंत भदाणे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रबंधक दिनेश वाघमारे, प्रकल्प सह- समन्वयक डॉ. राकेश घोडे, किशोर पारमवाळ, उपप्राचार्य आर.एन. निकम व प्राध्यापक उपस्थित होते.