भंडारा विभागा अंतर्गत काही विद्युत ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात आलेले आहे. याबद्दल सदर ग्राहकास कोणतीही पूर्वकल्पना किंवा माहिती सांगितली नाही. घरामध्ये कुणीही नसताना मीटर बदलून दिले जात आहेत.
या धडक मोर्चा धसका घेत महावितरण कंपनीचे अधिकारी स्वत: निवेदन स्वीकारण्याकरिता आले. मोर्चेकरांची मागणी मान्य केली. आणि तसे लेखी स्वरुपात दिले. त्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात अजय मेश्राम, माजी नगरसेविका जयश्री बोरकर, नितीन दुरुगकर, युवराज उके, सुनील बारई, संजय पंगवार, रामदास गिºहेपुंजे, ब्रिजलाल बावणे, नरेंद्र पहाडे, श्रीकृष्ण आगाशे, संजय मते, विलास इटनकर, नितीन धकाते, नितीन चव्हान, राजू देसाई, आखाडू शेंडे, विनोद भुरे, नीलेश मदनकर, जयेश वाणेरकर, पांडुरंग गायधने, शमीम शेख, इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.